टीव्ही अभिनेत्री सुरूची अडारकर करतेय नॉनस्टॉप ८४ तास काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 12:20 IST2017-05-22T06:50:09+5:302017-05-22T12:20:09+5:30

टीव्ही कलाकरांना मालिकांसाठी तासन तास काम करावे लागते.कधी कधी मालिकांच्या लेटनाईट शेड्युअल मुळ त्यांना घरी जाणेही शक्य होत नाही.प्रसिद्ध ...

Nonstop work for 84 hours, TV actress sticks with stance | टीव्ही अभिनेत्री सुरूची अडारकर करतेय नॉनस्टॉप ८४ तास काम!

टीव्ही अभिनेत्री सुरूची अडारकर करतेय नॉनस्टॉप ८४ तास काम!

व्ही कलाकरांना मालिकांसाठी तासन तास काम करावे लागते.कधी कधी मालिकांच्या लेटनाईट शेड्युअल मुळ त्यांना घरी जाणेही शक्य होत नाही.प्रसिद्ध व्हायला कोणाला नाही आवडतं पण प्रसिद्ध होण्याची एक किंमतही असते, टीव्ही मालिकेच्या कलाकारांसाठी ती किमंत त्यांच्या भरपूर मेहनतीतून दिसते.कलाकारांना जरी त्यांच्या कामाचे भरपूर पैसे दिले जात असले तरी त्यांच्या कामाचं स्वरूप बऱ्याच मेहनतीचं असतं,कलाकारांसाठी कामाचे वाढलेले तास हा एक मुख्य त्रास असतो आणि अनेक वेळा अनेक कलाकार भरपूर कामाच्या त्रासामुळे मालिकाही सोडतात.आठवड्यातून एकदा  किंवा  दोनदा एपिसोड असतील तर तेवढा त्रास नसतो पण जर डेलीसोप असेल तर मात्र कलाकारांची अगदीच हालत होत असते.अशीच हालत सध्या अंजली  मालिकेच्या सुरुची अडारकरची झालीय. अंजली ही मालिका सोमवार २२ मे पासून सुरु होत आहे. पण अजूनही अनेक गोष्टींचे शूटिंग वेळेअभावी पूर्ण झाले नाही.सकाळी ९ वाजता लागलेली शिफ्ट साधारणतः रात्री ९ ला म्हणजेच १२ तासांनी संपते. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे एपिसोडची पूर्ण बँकिंग अजून तयार झालेले नाही . ह्या गोष्टीचे महत्व सुरुचीला  नीट समजत असल्यामुळे  ह्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी तिनेच स्वीकारली आहे. प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मालिकेच्या एपिसोडचे जास्तीत जास्त बँकिंग व्हावे केवळ याकरिता सुरुची जोमाने कामाला लागली आहे. गेल्या आठवड्यात पूर्ण उत्साहाने तिने चक्क ८४ तास काम केलंय. तिची ही  मेहनत बघून दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आणि तिचे इतर सहकलाकार सुद्धा भारावून गेले आहेत. सुरुची अंजलीच्या भूमिकेत इतकी समरस झाली आहे की सेटवर सुद्धा सगळेच तिला तुफानी अंजली या नावानेच हाक मारतात आणि अंजली सुद्धा अगदी हसून न थकता प्रेक्षकांसाठी काम करायला तयार असते. आता तिची ही मेहनत प्रेक्षकांच्या मनाला किती भिडते ते मालिका रसिकांच्या भेटीला आल्यावरच स्पष्ट होईल.
 

Web Title: Nonstop work for 84 hours, TV actress sticks with stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.