'क्राइम पेट्रोल'ला गुड बाय केल्यानंतर अनुप सोनी या गोष्टी करण्यात आहे बिझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:21 IST2018-07-06T15:18:17+5:302018-07-06T15:21:19+5:30

सारं काही व्यवस्थित सुरु असताना अनुप सोनीने 'क्राइम पेट्रोल' शोला गुड बाय केलं.अनुप सोनीला पुन्हा अभियाकडे वळायचे आहे. याकारणामुळे त्याने हा शो सोडल्याचे सांगितले होते.

No more television, Anup Soni wants to Act in films | 'क्राइम पेट्रोल'ला गुड बाय केल्यानंतर अनुप सोनी या गोष्टी करण्यात आहे बिझी

'क्राइम पेट्रोल'ला गुड बाय केल्यानंतर अनुप सोनी या गोष्टी करण्यात आहे बिझी

छोट्या पडद्यावरील रसिकांचा लाडका अभिनेता अनुप सोनी क्राईम पेट्रोल शो सोडल्यानंतर काय करतो आहे. हे जाणून घेण्याची उत्सुकता असणार.सध्या अनुप सोनी व्हॅकेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे.नेहमीच्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत अभिनेता अनुप सोनी कुटुंबासह श्रीलंकामध्ये  व्हॅकेशन एन्जॉय  करतो आहे.या व्हॅकेशनचे काही फोटोही सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोत अनुप कुटुंबासह या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टीव्ही शो 'क्राइम पट्रोल' शुटिंगमुळे पूर्णवेळ कुटुंबासह क्वॉलिटी टाईम घालवणे अनुप सोनीला शक्य नव्हते.तसेच नुकतेच अनुप सोनीने क्राईम पेट्रोल सोडला आहे. गेल्या 8 वर्षापासून अनुप या टीव्ही सिरीजला होस्ट करत होता.कितीतरी क्राईम शो आले आणि गेले, मात्र क्राईम पेट्रोलची लोकप्रियता काही कमी झाली नाही. गेल्या वर्षात  8 जे झालं नाही ते आता घडलं.सारं काही व्यवस्थित सुरु असताना अनुप सोनीने क्राइम पेट्रोल शोला गुड बाय केलं.अनुप सोनीला पुन्हा अभियाकडे वळायचे आहे. याकारणामुळे त्याने हा शो सोडल्याचे सांगितले होते.सगळ्यात आधी मी एक अभिनेता आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी अभिनयापासून दूर गेलो होतो. त्यामुळे आता सिनेमा किंवा मालिकेत चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याचे अनुप सोनीने सांगितले आहे. 

अनुप सोनीने सुपरहिट ठरलेली 'बालिका वधू' मालिकेतही भैरव धरमवीर सिंगही भूमिका साकारली होती.मालिकेतील इतर भूमिकांप्रमाणे ही भूमिकाही रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.टीव्ही मालिकांसह त्याने अनेक हिंदी सिनेमातही विविधांगी भूमिकांमध्ये तो झळकला आहे.एकाच साचेबद्ध कामात न अडकता नवीन नवीन भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.तसेच अभिनयात छाप पाडणा-या अनुपने त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी खास मेकओव्हरही केला आहे. त्याच्या हा स्टायलिश लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे.आता त्याचा लूक त्याने नेमका कोणत्या सिनेमासाठी केला आहे याविषयी माहिती समोर आलेली नाही.तुर्तास संजय दत्तचा निर्मिती असलेला तेलुगू 'प्रस्थानम' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये अनुप झळकणार आहे. तेलुगू सिनेमा प्रस्थानमचे दिग्दर्शक देवा कट्टाच या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. लखनऊमध्ये सिनेमाच्या पहिल्या भागाचेही शूटिंग पूर्ण झाल्याचे समजते. 
 

Web Title: No more television, Anup Soni wants to Act in films