"सासरे नाही, माझे वडील होतात...", दिवंगत अभिनेते पंकज धीर यांच्या आठवणीत सून कृतिका भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:06 IST2025-10-30T17:06:09+5:302025-10-30T17:06:52+5:30
Kritika Sengar gets emotional in memory of late actor Pankaj Dheer : टीव्ही आणि चित्रपट अभिनेते पंकज धीर यांचं नुकतंच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून कृतिका सेंगर भावुक झाली आहे. नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने दुःख व्यक्त केले आहे.

"सासरे नाही, माझे वडील होतात...", दिवंगत अभिनेते पंकज धीर यांच्या आठवणीत सून कृतिका भावुक
टीव्ही आणि चित्रपट अभिनेते पंकज धीर यांचं नुकतंच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून कृतिका सेंगर भावुक झाली आहे. नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने दुःख व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, पंकज हे तिचे सासरे नसून तिचे वडील होते. ते नेहमी तिला सुनेऐवजी मुलगी मानायचे.
कृतिका सेंगरने नुकतेच दिवंगत अभिनेते पंकज धीर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ''तुम्हाला 'सासरचे लोक' हा शब्द कधीच आवडत नव्हता. तुम्ही नेहमी म्हणायचा की, ''ही माझी मुलगी आहे.' आणि तुम्ही मला मुलीसारखेच मानले आणि तसेच वागवले. तुम्ही तुमच्या नेहमीच्या चमकणाऱ्या डोळ्यांनी मला नेहमी विचारायचे, 'जगातील सर्वात चांगली मुलगी कोण आहे?' आणि मी हसून म्हणायचे, 'मी!''
तिने पुढे लिहिले की, ''मला नेहमी 'आय लव्ह यू डॅड' म्हणायला लाज वाटायची, पण मी सहजपणे म्हणेपर्यंत तुम्ही थांबत नव्हता. ही तुमची मला प्रेमाने मिठी मारण्याची पद्धत होती. तुम्ही फक्त माझे सासरे नव्हता; तुम्ही माझे वडील, माझे मित्र, माझी सुरक्षित जागा होता. आम्ही तासन् तास कोणत्याही गोष्टीबद्दल बोलायचो, आणि आता तुमच्याशिवाय ही शांतता सहन होत नाही. तुम्ही देविकावर ज्या प्रकारे प्रेम केले, त्यासाठी धन्यवाद. ती तुम्हाला नेहमी तिचे सर्वात चांगले आजोबा म्हणून लक्षात ठेवेल. आय लव्ह यू डॅड.''
पंकज धीर यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जगाला निरोप दिला. ते कर्करोगाने त्रस्त होते. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी जवळचे मित्र सलमान खानसह अनेक कलाकार उपस्थित होते.