नितू चंद्राने केले स्वरा भास्करला रिप्लेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 14:10 IST2017-05-22T08:40:15+5:302017-05-22T14:10:15+5:30
नितू चंद्राने गरम मसाला, ओए लकी! लकी ओए, वन टू थ्री यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सध्या दाक्षिणात्य ...
.jpg)
नितू चंद्राने केले स्वरा भास्करला रिप्लेस
न तू चंद्राने गरम मसाला, ओए लकी! लकी ओए, वन टू थ्री यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सध्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटात व्यग्र असून देखील ती आता छोट्या पडद्याकडे वळणार आहे. रंगोली हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा आवडता आहे. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनचे सूत्रसंचालन स्वरा भास्करने केले होते. पण आता या कार्यक्रमात नितूने स्वराची जागा घेतली आहे. या कार्यक्रमाद्वारे ती छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या कार्यक्रमाविषयी नितू सांगते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याविषयी मला गेल्या वर्षीच विचारण्यात आले होते. पण त्यावेळी मी माझ्या चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. टिव्हीवर काम करायचे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. पण सध्या मी माझ्या दाक्षिणात्य चित्रपटात व्यग्र आहे. तसेच मी एका चित्रपटाची निर्मिती देखील केली असून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच उमराव जान या माझ्या नाटकाचे जगभर प्रयोग सुरू आहेत. पण या सगळ्यातून वेळ काढून मी रंगोली करण्याचे ठरवले. कारण मी लहान असल्यापासून मी हा कर्यक्रम पाहात आहे. या कार्यक्रमासोबत माझे एक भावनिक नाते जोडले गेले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. माझ्या आजी-आजोबांचा तो आवडता कार्यक्रम होता. आमच्या घरात रविवारची सुरुवात तर याच कार्यक्रमाने व्हायची. त्यामुळे या कार्यक्रमासोबत माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहे. त्यामुळे हा कार्यक्रम करण्यास मी खूप खूश आहे.