"उडीयो ना डरियों कर मनमानी....", नितीश चव्हाणची श्वेता राजनच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:16 AM2024-04-22T11:16:28+5:302024-04-22T11:16:55+5:30

Shweta Kharat And Nitish Chavan : अभिनेत्री श्वेता खरातच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता नितीश चव्हाणने खास पोस्ट शेअर केली आहे.

Nitish Chavan's special post on the occasion of Shweta Rajan's birthday | "उडीयो ना डरियों कर मनमानी....", नितीश चव्हाणची श्वेता राजनच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

"उडीयो ना डरियों कर मनमानी....", नितीश चव्हाणची श्वेता राजनच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' मालिकेतील अज्या अर्थात अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. डान्सची आवड असल्यामुळे तो डान्सचे व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना खुश करतो. बऱ्याचदा तो अभिनेत्री श्वेता राजन खरात (Shweta Rajan Kharat)सोबतही गाण्यावर थिरकताना दिसतो. त्या दोघांच्या डान्स व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. दरम्यान नुकताच श्वेताचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने नितीशने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

नितीश चव्हाणने इंस्टाग्रामवर श्वेताच्या व्हिडीओचा कोलाज बनवून शेअर केला आहे. ज्यात ती नाचताना, धमाल मस्ती करताना दिसते आहे. त्याने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, आत्तापर्यंत तू जे काही कमवलंय जे काही मिळवलंय ते स्वतःच्या बळावर कमवल आहेस. आत्ता तू ज्या स्थानावर आहेस ते फक्त आणि फक्त स्वतःच्या कष्टामुळे त्यामुळे तुला कोणीही कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न केला तरी उडीयो ना डरियों कर मनमानी मनमानी मनमानी...बढीयों ना मुडियों कर नादानी...... मला माहितीये तू कधीच डगमगत नाहीस आणि माझा विश्वास आहे तू कधी डगमगणार नाहीस, तू खूप मेहनती, टॅलेंटेड, स्मार्ट आहेस त्यामुळे फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि आयुष्यात अशीच उंच भरारी घेत राहा. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

नितीशच्या या पोस्टवर चाहते श्वेताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान या पोस्टवर श्वेतानेदेखील कमेंट केली आहे. तिने लिहिले की, धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे. मी जे काही करू शकले कारण तुम्ही (पालक आणि तू) माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. आणि माझ्या प्रत्येक यशामध्ये तुझा खूप मोठा वाटा आहे. तू नेहमी माझ्यासोबत तिथे होतास.  तसेच माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण केल्याबद्दल धन्यवाद. आणि जे काही लिहिलेस रोज मला न विसरता आठवण करून देतोस. सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे.

श्वेता आणि नितीश सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकदा ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण येते. मात्र अद्याप त्या दोघांनी याबाबत चुप्पी साधली आहे.

Web Title: Nitish Chavan's special post on the occasion of Shweta Rajan's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.