२७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, ट्रोलिंगवर निहारिका चौक्सी म्हणाली, "शरद सर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:57 IST2025-07-08T12:54:56+5:302025-07-08T12:57:55+5:30

शरद केळकर आणि निहारिका यांच्यात २७ वर्षांचं अंतर आहे.

Niharika Chouksey reacts on trolling on romance with 27 years elder sharad kelkar in tumse tum tak serial | २७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, ट्रोलिंगवर निहारिका चौक्सी म्हणाली, "शरद सर..."

२७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, ट्रोलिंगवर निहारिका चौक्सी म्हणाली, "शरद सर..."

अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) ८ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करत आहे. 'तुमसे तुम तक' मालिकेत तो दिसणार आहे. या मालिकेत निहारिका चौक्सी (Niharika Chouksey) मुख्य भूमिकेत आहे. निहारिका आणि शरद केळकर यांच्यात २७ वर्षांचं अंतर आहे. इतक्या मोठ्या वयाच्या अभिनेत्यासोबत मालिकेत रोमान्स करणार असल्याने निहारिका ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगवर तिने आता उत्तर दिलं आहे.

'तुमसे तुम तक' मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच समोर आला. यामध्ये शरद आणि निहारिकाची केमिस्ट्री दिसत आहे. तर अनेकांनी ती शरदची मुलगीच वाटत आहे अशी कमेंट करत ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगवर नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निहारिका म्हणाली, "ज्यांना मालिकेचा प्रोमो आवडला नाही ते फक्त ट्रेलर पाहून जज करत आहेत. पण जेव्हा तुम्ही मालिका बघाल तेव्हा अनु आणि आर्याच्या प्रेमात पडाल. मला ट्रोलिंगमुळे फरक पडत नाही. शोबद्दल लोकं चर्चा करत आहेत यातच मी खूश आहे."

शरद केळकरसोबत काम करण्याबद्दल निहारिका म्हणाली , "शरद खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. ते इतक्या वर्षांपासून काम करत आहेत. जितकं माझं वयही नाही तितका त्यांचा अनुभव आहे. त्यांना गोष्टी कशा हँडल करायच्या हे त्यांना चांगलं माहित आहे. शरद सर या ट्रोलिंग वगैरे गोष्टी फारशा गांभीर्याने घेत नाहीत. जे लोक ट्रोल करत आहेत तेच मालिका बघून आपल्यावर प्रेम करतील असा त्यांना विश्वास आहे. मी रोज त्यांच्याकडून काही ना काही शिकते. ते खूप डाऊन टू अर्थ आहेत."

'तुमसे तुम तक' मालिका मराठीतील 'तुला पाहते रे' मालिकेचा रिमेक आहे. 'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावे आणि गायत्री दातार दिसले होते. ही मालिका चांगलीच गाजली होती.

Web Title: Niharika Chouksey reacts on trolling on romance with 27 years elder sharad kelkar in tumse tum tak serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.