युजरने ‘बदसूरत’ म्हणून हिणवले अन् निया शर्माने सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 08:00 PM2019-01-13T20:00:00+5:302019-01-13T20:00:02+5:30

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर निया अनेकदा ट्रोल झाली आहे. अगदी लिपस्टिकच्या रंगावरूनही नियाला लोकांनी नाही-नाही ते सुनावले.

nia sharma shuts down trolls with an epic reply after trollers called her ugly | युजरने ‘बदसूरत’ म्हणून हिणवले अन् निया शर्माने सुनावले!!

युजरने ‘बदसूरत’ म्हणून हिणवले अन् निया शर्माने सुनावले!!

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर निया अनेकदा ट्रोल झाली आहे. अगदी लिपस्टिकच्या रंगावरूनही नियाला लोकांनी नाही-नाही ते सुनावले. ‘इश्क में मरजावां’ या मालिकेत नियाने अलिया पवारची जागा घेतली आणि यामुळेही ती ट्रोल झाली. अर्थात यावेळी नियाने या ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सुनावले.
‘इश्क में मरजावां’च्या चाहत्यांना अलीशा व अर्जुन बिजलानीची केमिस्ट्री चांगलीच भावली होती. पण अलीशाच्या जागी निया आली अन् चाहते बिथरले. एका अशाच बिथरलेल्या चाहत्याने नियाला ‘बदसूरत’ म्हणून हिणवले. मग काय, नियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने लगेच या चाहत्याला खरीखोटी सुनावले.



‘How about smiley exiting your ugly face forever!! Nonetheless keep watching१’, असे नियाने लिहिले. निया इथेच थांबली नाही तर, तिने आणखीही एक टिष्ट्वट केले.



‘माझा कुरूप चेहरा पडद्यावर दिसतो तरी. तुमचे चेहरे नसलेले कुरूपपण मात्र मी अद्यापही सहन करतेय,’असे तिने लिहिले. नियाची ही वाक्ये त्या चाहत्याला इतकी झोंबलीत की, त्याने थेट नियाला ब्लॉक करून टाकले.


२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Web Title: nia sharma shuts down trolls with an epic reply after trollers called her ugly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.