'तू चाल पुढं' मालिकेत येणार ट्विस्ट, अश्विनी सोबतच वाघमारे कुटुंबासमोर उभा राहणार मोठा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 04:26 PM2022-10-20T16:26:57+5:302022-10-20T16:31:40+5:30

दिपा परबची कमबॅक असलेली मालिका 'तू चाल पुढं' अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उरतली. आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

New twist will come in Tu Chal Pudha serial | 'तू चाल पुढं' मालिकेत येणार ट्विस्ट, अश्विनी सोबतच वाघमारे कुटुंबासमोर उभा राहणार मोठा प्रश्न

'तू चाल पुढं' मालिकेत येणार ट्विस्ट, अश्विनी सोबतच वाघमारे कुटुंबासमोर उभा राहणार मोठा प्रश्न

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी तू चाल पुढं (Tu Chal Pudha) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच दिवशी मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अश्विनी वाघमारे मयुरी आणि कुहू या तिच्या दोन मुली, नवरा श्रेयस वाघमारे, सासू सासरे, नणंद शिल्पी आणि नंदेचा मुलगा अशी प्रमुख पात्र या मालिकेत दाखवण्यात आली आहेत. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं वळवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते.

अश्विनी आणि श्रेयस कुलदेवीच्या मंदिरात भूमिपूजनासाठी वीट आणायला त्यांच्या गावी निघतात. या प्रवासादरम्यान अश्विनी आणि श्रेयस यांच्यातील लुटूपुटूची भांडण आणि दोघांच्या आयुष्यातील काही प्रेमळ निवांत क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या वर्षी वाघमारे कुटुंबात मोठ्या आनंदात दिवाळी साजरी होणार आहे, तसेच या भूमिपूजनादरम्यान एक मोठा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळेल. 

भूमिपूजन करताना ज्याठिकाणी जमीन खोदली जाते तिकडून गणपतीची मूर्ती बाहेर पडते, त्याचवेळी गावकरी ठरवतात की ह्याठिकाणी मंदिरच होणार, त्यामुळे अश्विनी सोबतच वाघमारे कुटुंबासमोर  मोठा प्रश्न उभा आहे तो म्हणजे घर की मंदिर आता अश्विनी तिचं घर बांधण्यात यशस्वी ठरेल की मंदिर बांधण्यासाठी जागा सोडेल? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल.

Web Title: New twist will come in Tu Chal Pudha serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.