गोठ या मालिकेला आता मिळणार हे वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:30 IST2018-07-16T16:29:12+5:302018-07-16T16:30:40+5:30

गोठ या मालिकेत आता राधाच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार असून त्याच्या येण्याने राधा आणि विलासच्या कुटुंबात आनंद निर्माण होणार आहे. 

New twist in goth star pravah serial | गोठ या मालिकेला आता मिळणार हे वळण

गोठ या मालिकेला आता मिळणार हे वळण

स्टार प्रवाहवरील गोठ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेला आता चांगलेच वळण मिळणार असून हे वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
स्टार प्रवाहवरील गोठ मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळणार आहे. विलास आणि राधा यांच्या नात्यात नीलाच्या रूपाने अडथळा निर्माण झाला आहे. नीलाची विचित्र अट मान्य केल्यानंतर आपली गोड बातमी राधा विलासला कशी सांगेल असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता नात्यातले समज-गैरसमज दूर करून विलास आणि राधा जवळ आले आहेत. मात्र नीला सतत काही ना काही खेळी खेळून त्यांच्यात दरी निर्माण करू पाहात आहे. दोन वर्षं गर्भधारणा होऊ न देण्याची नीलाची अट राधाने मान्य केलीय. ही अट विचित्र असूनही राधा त्यासाठी तयारी दर्शवते. मात्र गोड बातमी कळल्यानंतर तिच्या मनात त्याविषयी द्विधा मन:स्थिती निर्माण होते. आता विलासला आणि कुटुंबीयांना राधा ही बातमी कधी आणि कशी सांगेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अडचणीत आलेली राधा त्यावर मार्ग काढते का, त्यात तिला काही अडचणी येतात का? या प्रश्नांची उत्तर पुढील भागांतून मिळणार आहेत. 
गोठ या मालिकेत आता राधाच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार असून त्याच्या येण्याने राधा आणि विलासच्या कुटुंबात आनंद निर्माण होणार आहे. 
गोठ या मालिकेत रुपल नंद राधाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. अभिनयाकडे वळालेली रुपल नंद ही फिजिओथेरपिस्ट आहे. आवड असल्याने ती अभिनय क्षेत्राकडे वळाली आणि अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय तिने घेतला. मूळची पुण्याची असलेली रुपल नंदने फर्ग्युसन कॉलेजमधून फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचवेळी ती आवड म्हणून महाविद्यालयात नाटकांत काम करत होती. पुरुषोत्तम करंडकसह अनेक स्पर्धांत एकांकिकामध्ये तिने अभिनय केला. 

Web Title: New twist in goth star pravah serial