लवकरच भेटीला येतेय नवी मालिका 'ठिपक्यांची रांगोळी', उलगडणार एकत्र कुटुंबाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:38 IST2021-09-20T16:38:16+5:302021-09-20T16:38:39+5:30

नवीन मालिका ठिपक्यांची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

New series 'Tipakyanchi Rangoli' coming soon, family story to unfold | लवकरच भेटीला येतेय नवी मालिका 'ठिपक्यांची रांगोळी', उलगडणार एकत्र कुटुंबाची गोष्ट

लवकरच भेटीला येतेय नवी मालिका 'ठिपक्यांची रांगोळी', उलगडणार एकत्र कुटुंबाची गोष्ट

स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका ठिपक्यांची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभाप्रमाणे. असा हा हसता खेळता परिवार ४ ऑक्टोबरपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहच्या कुटुंबासोबत जोडला जाणार आहे.

ठिपक्यांची रांगोळी या नाविन्यपूर्ण शीर्षकाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढत बसलेल्या माझ्या मुलीला पाहून मनात विचार आला की कसा एक ठिपका दुसऱ्या ठिपक्यापर्यंत रेष काढून जोडला जातो. बघताना हे सगळे ठिपके स्वतंत्र वेगळे एकमेकांपासून काही अंतरावर असले तरी जोडले गेल्यावर सुरेख नक्षी बनते. या मालिकेचं नाव ठिपक्यांची रांगोळी ठेवण्यामागचं हेच कारण. जोडून राहिलो तर छान सुरेख नक्षी मात्र एक रेष जरी हलली तरी चित्र विस्कटते. नातेसंबंधांचे देखील असेच असते. नाती जोडून ठेवावी लागतात. हात पकडून ठेवावा लागतो, साथ द्यावी लागते, समजून घ्यावे लागते. एकमेकांपर्यंत पोहोचावे लागते. नाती कशी सुंदर असतात हे या मालिकेतून दाखवण्यात येईल. रांगोळी दारासमोर असणे हे शुभ असते. असेच शुभ संकेत घेऊन आम्ही येतोय. ठिपक्यांची रांगोळी घेऊन प्रत्येक घरात रंग भरण्यासाठी.’

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रुपाली गुहा  आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची असून गिरीश वसईकर या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. पाहायला विसरु नका नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: New series 'Tipakyanchi Rangoli' coming soon, family story to unfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.