गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्लोक आणि कुहूच्या नात्याला मिळेल का एक नवीन दिशा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 13:15 IST2018-03-17T07:45:46+5:302018-03-17T13:15:46+5:30

देवाचं अस्तित्व खरंच आहे की नाही? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय? आस्तिक असणं योग्य आहे की नाही? ...

A new direction for the marriage of Shlok and Kuhu on the occasion of Gudi Padva? | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्लोक आणि कुहूच्या नात्याला मिळेल का एक नवीन दिशा?

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्लोक आणि कुहूच्या नात्याला मिळेल का एक नवीन दिशा?

वाचं अस्तित्व खरंच आहे की नाही? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय? आस्तिक असणं योग्य आहे की नाही? समाजामध्ये सुरु असलेल्या या द्वंद्वावर भाष्य करणारी "देवाशपथ" या मालिकेतील श्लोक (संकर्षण कऱ्हाडे)ला घरच्यांचा अति देव-देव करणं त्याला अजिबात पटत नाही.कुहू (कौमुदी वलोकर) आपल्या बाबाला श्लोकबद्दल सांगावं की नाही या संभ्रमात गुंतत चालली असते.कुहूच्या बाबाला श्लोक अजिबात आवडत नाही पण श्लोकशिवाय ती राहू पण शकत नाहीये. ज्या नारळावरून श्लोकच्या भविष्याची दिशा ठरणार आहे ते अण्णा महाराजांनी श्लोकच्या घरात ठेवलेलं आहे, जे गुढीपाडव्याच्या दिवशी फोडलं जाणार आहे.हे नारळ फोडताना कुहू तिथे असायला हवी असं अण्णा महाराजांनी श्लोकच्या वडिलांना सांगितल्यामुळे कुहू गुढीपाडव्याच्या दिवशी दशपुत्रेंच्या घरी जाणार आहे.नेमकं काय होईल गुढीपाडव्याच्या दिवशी? अण्णा महाराज आणि नारायण यांची भेट होईल का? जर खरंच घरात असलेलं नारळ श्लोकच्या भविष्याची दिशा ठरवणार असेल तर श्लोकला त्याची प्रचिती येईल का? गुढीपाडव्याच्या निमित्तावर कुहू तिच्या जोडीदाराबद्दल तिच्या बाबाला खरं काय ते सांगू  शकेल का? कुहूची श्लोकच्या भविष्याबद्दलची काळजी अण्णा महाराज मिटवू शकतील का? अशा सगळ्या प्रश्नांचा उलगडा मालिकेच्या या स्पेशल भागात होणार आहे.

आज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे,श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवत आहेत.त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथ्वीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळत आहे.'देवाशप्पथ' ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.मालिकेत विद्याधर जोशी,सीमा देशमुख,स्वानंद बर्वे,शाल्मली टोळ्ये,अभिषेक कुलकर्णी,कौमुदी वालोकर,चैत्राली गुप्ते,आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: A new direction for the marriage of Shlok and Kuhu on the occasion of Gudi Padva?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.