“फुलपाखरू” मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस आणि वैदेहीची एक नवीन सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 12:48 IST2018-03-17T07:18:38+5:302018-03-17T12:48:38+5:30

अल्पावधीतच 'फुलपाखरू' मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे.यातली वैदेही (हृता दुर्गुळे) तमाम तरूणांच्या दिलाची धडकन आहे तर मानस (यशोमान आपटे) ...

A new beginning of 'Manas' and Vaidya on the auspicious time of 'Gudi Padva' in "Butterfly" | “फुलपाखरू” मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस आणि वैदेहीची एक नवीन सुरुवात

“फुलपाखरू” मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस आणि वैदेहीची एक नवीन सुरुवात

्पावधीतच 'फुलपाखरू' मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे.यातली वैदेही (हृता दुर्गुळे) तमाम तरूणांच्या दिलाची धडकन आहे तर मानस (यशोमान आपटे) सगळ्या मुलींचा लाडका आहे.कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम.. त्यांचा एकमेकांवरचा लटका राग.. त्यांची खोडकर मस्ती.. थोडे रुसवे - फुगवे.एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची हि प्रेमकथा म्हणजे "फुलपाखरू".धुळवडीच्या दिवशी मानस आणि वैदेही एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आहेत.दोघांच्याही घरून त्यांच्या प्रेमाला सुखद होकारसुद्धा मिळाला असल्याने दोघेही खुश आहेत.सगळं आलबेल असताना अचानक माशी शिंकावी तशी रॉकीने या दोघांमध्ये एन्ट्री घेतली आहे.मायाचा मित्र असलेल्या रॉकीने दिलेलं चॅलेंज वैदेहीने स्विकारलं आहे.रॉकीला हरवण्यासाठी मानस आणि वैदेहीने आपल्या मित्रांना घेऊन 'दोस्ती' बॅंड सुरु केला आहे.सगळेच नवीन असल्यामुळे त्यांची थोडी धांदल उडतीये,पण तरीही मानस आणि वैदेही सगळ्यांना सपोर्ट देत आहेत.आपल्या होणाऱ्या सुनाबाईंचा अपमान सहन न होऊन मानसचे वडीलही त्यांना हवी ती मदत करायला तयार झालेले आहेत.वैदेहीने घेतलेलं चॅलेंज पूर्ण करण्याच्या दृष्टीने मानस बॅंडसाठी एक नवीन गाणं लिहिणार आहे.गुढीपाडव्याचा दिवशी त्याची इन्सपिरेशन असलेल्या वैदेही समोर असताना अचानक मानसला हे गाणं सुचतं. फुलपाखरूच्या प्रेक्षकांसाठी या नव्या गाण्याची पर्वणी असणार आहे.तिथे माया मानसला वैदेहीपासून वेगळं करण्यासाठी तान्या आणि रॉकीला हाताशी धरून नवनवीन चाली खेळत असते.मानसचं गाणं हे बॅण्डचं गाणं होऊ शकेल का? या गाण्याने दोस्ती बॅण्ड रॉकीला हरवू शकेल का? वैदेहीने घेतलेल्या चेलेंजमध्ये ती कितपत यशस्वी होऊ शकेल? माया वैदेहीला हरवण्यासाठी कुठला नवीन डाव खेळेल?हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

Web Title: A new beginning of 'Manas' and Vaidya on the auspicious time of 'Gudi Padva' in "Butterfly"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.