ब्रेकअप नंतर नेहा पेंडसे पुन्हा पडली या अभिनेत्याच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 14:17 IST2017-05-22T12:08:57+5:302017-05-23T14:17:46+5:30

सुमारे दीड वर्षांपूर्वी नेहा पेंडसेचे तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाले होते.दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्रीही होती.तो एनआरआय असल्याने तिनं अमेरिकेत स्थायिक ...

Neha Pendse fell after the breakup of the actress in love? | ब्रेकअप नंतर नेहा पेंडसे पुन्हा पडली या अभिनेत्याच्या प्रेमात?

ब्रेकअप नंतर नेहा पेंडसे पुन्हा पडली या अभिनेत्याच्या प्रेमात?

मारे दीड वर्षांपूर्वी नेहा पेंडसेचे तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाले होते.दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्रीही होती.तो एनआरआय असल्याने तिनं अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णयदेखील घेतला होता.पण अखेरच्या क्षणी त्याने माघार घेतली.ती अभिनेत्री असल्याने नेहमीच तिच्या करियरला प्राधान्य देणार आणि त्यामुळे ती एक चांगली गृहिणी होऊ शकणार नाही असे त्याचे मत होते. त्यानंतर तिच्या प्रियकराने दुस-या मुलीसह लग्न केले.या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी गेली दीड वर्ष तिनं स्वतःला कामात झोकून दिले होते.पण आता पुन्हा एकदा नेहा पेंडसे एका व्यक्तिच्या प्रेमात पडली असल्याचे खुद्द नेहानेच सांगितले आहे.

‘मे आय कम इन, मॅडम?’ मालिकेत  नेहमीप्रमाणेच साजन अगरवाल (संदीप आनंद) आपल्या वर्चस्ववादी, तापट बॉस संजनावर (नेहा पेंडसे) आपला प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नात असतो. पण यावेळी कथेला काहीशी कलाटणी मिळणार आहे.यावेळी त्याची संजना ही बॉस एका ‘कन्फेशन बॉक्स’मध्ये साजनबद्दल तिला वाटणा-या हळव्या भावनेची कबुली देणार असून त्याच्याबरोबर ‘डेट’वर जाण्याची इच्छाही व्यक्त करणार आहे. कथेनुसार मॅडम संजना आपल्या कार्यालयात एका कन्फेशन बॉक्सची उभारणी करते. तिच्या मते, कर्मचा-यांना आपल्या खर्‍या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याची हा बॉक्स म्हणजे एक चांगली सोय आहे. या बॉक्समध्ये स्वत: संजना साजनबद्दल वाटणा-या प्रेमाची कबुली देते. तिथेच एका डमीखाली लपलेला साजन तिची ही कबुली ऐकतो. त्यानंतर तो मॅडमना एका डेटवर घेऊन जाण्याची योजना आखतो.मॅडम संजना त्याच्याबरोबर डेटवर जातात काय? साजनबरोबर डेटवर जाण्याविषयी नेहा पेंडसेला विचारले असता ती म्हणाली, “आमच्या मालिकेत धमाल-मस्ती आणि नाट्य़पूर्णता पुरेपूर भरलेली आहे. यावेळच्या भागात साजनबद्दलच्या प्रेमळ भावनांची कबुली मॅडम संजना देते खरी,परंतु तिच्या या खर्‍या भावना आहेत की ती साजनची चेष्टा करते आहे,लवकरच याचा खुलासा मालिकेच्या आगामी भागात होणार आहे.

Web Title: Neha Pendse fell after the breakup of the actress in love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.