नेहा बाम 'कृष्णदासी' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:54 IST2016-08-04T09:24:06+5:302016-08-04T14:54:06+5:30
'डर्टी' पिक्चर सिनेमात अभिनेत्री विद्या बालनच्या आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्री नेहा बाम 'कृष्णदासी' मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेत ...

नेहा बाम 'कृष्णदासी' मालिकेत
' ;डर्टी' पिक्चर सिनेमात अभिनेत्री विद्या बालनच्या आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्री नेहा बाम 'कृष्णदासी' मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेत नेहा बाम प्रद्युम्न (उदय टिकेकर) यांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळतील.भामिनी असं नेहा बाम साकारत असलेल्या भूमिकेचं नाव आहे.भामिनी यांच्या पतीने म्हणजेच प्रद्युम्ननं पत्नीचं निधन झाल्याचं सांगितलं होतं. मात्र आता भामिनी मृत्यूच्या दारातून परतणार असून सगळ्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे.आता भामिनीच्या या खोट्या गूढ मृत्यूचं कोडं काय असेल ते लवकरच कृष्णदासी मालिकेत उलगडलं जाणार आहे.