अभिनेत्याला व्यवसायात आलं यश, आता उचललं 'हे' मोठं पाऊल, कलाविश्वातून होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:17 IST2025-12-30T09:12:54+5:302025-12-30T09:17:14+5:30
प्रसाद लिमयेची मोठी भरारी! अभिनेता झाला भावूक, म्हणाला "स्वामींच्या कृपेने स्वप्न पूर्ण झालं"

अभिनेत्याला व्यवसायात आलं यश, आता उचललं 'हे' मोठं पाऊल, कलाविश्वातून होतंय कौतुक
आजच्या काळात केवळ अभिनयावर अवलंबून न राहता अनेक कलाकार आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी नवनवीन पाऊलं उचलत आहेत. अभिनयासोबतच हॉटेल, फॅशन, प्रॉडक्शन आणि स्टार्टअप्स यांसारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकप्रिय अभिनेता प्रसाद लिमयेनं असंच काहीसं केलं आहे. एका छोट्याशा उपक्रमातून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आता एका मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
प्रसाद लिमये याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर असतानाच, प्रसादने आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं होतं. विशेष म्हणजे, एका छोट्या 'अन्नपूर्णा क्लाऊड किचन आणि कॅटरिंग सर्विस'पासून सुरू झालेला हा प्रवास आता एका मोठ्या हॉटेलपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या हॉटेलबद्दल माहिती देताना अभिनेता भावुक झाला. तो म्हणाला, "नमस्कार... साधारण एक-दीड वर्षांपूर्वी मी 'अन्नपूर्णा' क्लाउड किचन सुरू केलं होतं. त्याला खूप प्रेम मिळालं, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मिळाला. मला आज सांगताना खरंच खूप आनंद होतोय, शब्द सुचत नाहीये... आज स्वामींच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आपलं 'अन्नपूर्णा' आता नव्या रुपात तुमच्यासमोर येत आहे. अन्नपूर्णाची ठाण्यातील सगळ्यात पहिली Dine In ची फ्रँचायझी कोल्हापुरी Zanka या ब्रँडने घेतलीये".
प्रसादने आपल्या चाहत्यांना आणि खवय्यांना खास आमंत्रण दिले आहे. तो म्हणाला, "एवढे महिने खूप जणांचे मेसेज यायचे की, आम्हाला संपूर्ण कुटुंबाला तुमच्या इथे जेवायला यायचंय, तेव्हा जागा उपलब्ध व्हायची नाही. कारण, आधी हा व्यवसाय मी छोट्या प्रमाणात सुरू केला होता. पण, आज मला हे सांगताना खूप आनंद होतोय. आता तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन, आमच्या अन्नपूर्णामध्ये पोटभर जेवायला नक्की या. हे आऊटलेट ठाण्यातील कोलशेत इथे सुरू झालं आहे". संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.