सरस्वती मालिकेत नवरात्रौत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 14:09 IST2017-09-21T08:39:30+5:302017-09-21T14:09:30+5:30
कोणत्याही सणांना सुरुवाती झाली की छोट्या पडद्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सगळेच उत्सव मोठ्या ...

सरस्वती मालिकेत नवरात्रौत्सव
क णत्याही सणांना सुरुवाती झाली की छोट्या पडद्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सगळेच उत्सव मोठ्या उत्सहात साजरा केले जातात. सरस्वतीवर कोणतेही संकंट आले असले तरी पण ती देवाची पूजा, सणासुदीची तयारी मन लावून करते. आता मालिकेमध्ये नवरात्रीचा उत्सवदेखील मोठ्या उत्सहात साजरा केला जाणार आहे. सरस्वती आणि देविका दोघी मिळून घटस्थापना तर करणार आहेत, पण देविका आणि सरस्वती मिळून विद्युल आणि भुजंगच्या विरोधात उभ्या राहतील का ? देविका सरस्वतीला माफ करेल का? यावेळेस देवी सरस्वतीच्या सर्व दु:खाचं कसं निवारण करेल, हे आपल्याला लवकरच कळेल.
सरस्वती मालिकेमध्ये देविकाला आता कळाले आहे कि, सरस्वतीच राघवची बायको आहे आणि हे कळल्यापासून ती सरस्वतीवर रुसली आहे. पण, सरस्वती देविकाची समजूत काढण्यात यशस्वी ठरेल का ? ती देविकाला पटवून देऊ शकेल का कि कशा त्या दोघी विद्युल आणि भुजंगच्या जाळ्यामध्ये अडकल्या आहेत. यासाठी त्या दोघांनी एकत्र यावे लागले. तर दुसरीकडे विद्युल देविका आणि सरस्वतीच्या विरोधात अजून एक कारस्थान रचते. ती सरस्वती आणि देविकाला कैकाली मंदिराचे जिने धुणे, १०८ दिवे बनवणे, मंदिराला प्रदक्षिणा घालणे अशा बऱ्याच गोष्टी सांगते आणि या दोघी मिळून ही परीक्षा पूर्ण देखील करतात. आता सरस्वती कशी देविकाच्या सहाय्याने विद्युल आणि भुजंगच्या प्रत्येक कारस्थानांना उलटून कशी लावते हे बघणे रंजक असणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेत देविका म्हणून जुई गडकरीने एंट्री घेतली आहे. अस्ताद काळे आणि तितिक्षा गावडेच्या जोडी प्रमाणे प्रेक्षक देविका म्हणजचे जुई गडकरीला सुद्धा प्रेम देतायेत. देविकाच्या येण्याने सरस्वती - राघवमध्ये दुरावा येईल असे वाटले होते मात्र तसे काहीही झाले नाही. जुई गडकरी बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर परतली आहे. पुढचे पाऊलमध्ये ती साकारलेली कल्याणी प्रेक्षकांच्या चांगल्याच पंसतीस उतरली होती.
ALSO READ : सरस्वती फेम तितिक्षा तावडेला आहे 'हा' छंद