बॅन्जो चित्रपटातील नर्गिसचा फस्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 02:06 IST2016-03-15T08:37:43+5:302016-03-15T02:06:39+5:30
रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची चर्चा जगजाहीर आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख हटके लूकमध्ये पाहायला मिळायला. रितेशचा बॅन्जो ...

बॅन्जो चित्रपटातील नर्गिसचा फस्ट लूक
र ी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची चर्चा जगजाहीर आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख हटके लूकमध्ये पाहायला मिळायला. रितेशचा बॅन्जो लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तसेच या चित्रपटाच्या सेटवरच्या धम्माल, मस्ती सोशलमिडीयाच्या वेगवेगळया माध्यमातून पाहायला मिळाला. पण या चित्रपटात बॉलीवुड अभिनेत्री नर्गिस फकरी असल्यामुळे या चित्रपटाला चार चॉद लागले आहेत. त्यामुळे साहजिकच तिच्या या बॅन्जो मराठी चित्रपटात कसा लूक असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखिर ही उत्सुकता संपली आहे म्हणण्यास हरकत नाही. कारण नुकताच नर्गिसने स्वत: बॅन्जो या चित्रपटातील लूक आउट केला आहे. या लूकमध्ये ती एका वेस्टन लूकमध्ये दिसत आहे.कानात हेडफोन, व्हाईट कलरच्या पॅक नेक शर्ट,शॉटर्स जीन्स, व कमरेला बांधलेल्या लाल जॅकेटमध्ये ती एकदम हटके व बिनधास्त दिसत आहे. तिच्या सोशलमिडियावर केलेल्या स्टेटसवरून कळते की, ती न्यूयार्क ची डीजे असून ती कामानिमित्त मुंबईत आली आहे. असो, रितेशप्रमाणे नर्गिसचा हा बॅन्जो लूकदेखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करूयात!