"खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 11:30 AM2024-05-05T11:30:11+5:302024-05-05T11:31:02+5:30

Namrata Sambherao And Prasad Khandekar : नम्रता संभेरावने २०१३ आणि २०२४ मधला प्रसाद खांडेकरसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Namrata Sambherao's special post on the occasion of Prasad Khandekar's birthday | "खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

"खूप मोठा हो यशाची शिखरं गाठ...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) शोने रसिकांच्या मनात घर केले आहे. या माध्यमातून अनेक कलाकार घराघरात पोहचले आहेत. यातील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) आणि अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) ही जोडी नेहमी चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या माध्यमातून नम्रता-प्रसाद यांची जोडी चांगलीच गाजली. ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. दरम्यान आज प्रसादचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे.

नम्रता संभेरावने २०१३ आणि २०२४ मधला प्रसादसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, दहा वर्षाच्या मैत्रीसाठी चिअर्स. पश्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू टॅलेंटेंड आहेस. तू अष्टपैलू माणूस आहेस. खूप चांगला मुलगा. खास मित्र, माझा मार्गदर्शक. सकारात्मकता आणि सर्व गोष्टींचा ओव्हरलोड. खूप प्रेम पश्या. खूप मोठा हो यशाची शिखरे गाठ. 

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले की, तुझ्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सची लाइन लागू दे ,सिनेमे नाटक सगळंच खूप गाजू दे ,त्या सगळ्यात मी नेहमीच असेन बाय डिफॉल्ट. कारण माझ्या आयुष्यातल्या पहिल्या बक्षिसाची सुरुवात तू लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या कुर्रर्रर्र ह्या नाटका पासून झाली आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद आणि काळजी घ्या. आज हास्यदिन आहे किती सुंदर योगायोग.

'नाच गं घुमा'बद्दल 
नम्रता संभेरावचा नुकताच 'नाच गं घुमा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Web Title: Namrata Sambherao's special post on the occasion of Prasad Khandekar's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.