नमिष तनेजा घेणार देशभरातील 51 चाहत्यांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:13 IST2017-11-27T09:43:28+5:302017-11-27T15:13:28+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘इक्यावन’ या नव्या मालिकेत प्राची तेहलान आणि नमिष तनेजा हे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.या मालिकेच्या प्रसिध्दीसाठी नमिषने ...

Namish Taneja will be a gift to 51 fans across the country! | नमिष तनेजा घेणार देशभरातील 51 चाहत्यांची भेट!

नमिष तनेजा घेणार देशभरातील 51 चाहत्यांची भेट!

्टार प्लस’वरील ‘इक्यावन’ या नव्या मालिकेत प्राची तेहलान आणि नमिष तनेजा हे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.या मालिकेच्या प्रसिध्दीसाठी नमिषने एक नवी कल्पना सादर केली आहे. नमिषने जगभरातील आपल्या 51 कट्टर चाहत्यांची भेट घेण्याचा संकल्प सोडला आहे. आजवर विविध टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारून प्रसिध्दीस आलेला नमिष आता ‘इक्यावन’ मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करीत आहेत. या मालिकेत तो सत्याची भूमिका साकारीत असून तो मालिकेची नायिका सुशील (प्राची तेहलान) हिच्याविरोधात असतो. नमिषने आपल्याला भेटावे, अशी त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असून तशा अनेक विनंत्या त्याच्याकडे सतत येत असतात. आपल्या चाहत्यांच्या या विनंतीला मान देऊन नमिषने आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासाठी भारतभर दौरा काढला आहे. त्याला तांत्रिक बाबींची तितकीशी माहिती नसल्याने सोशल मीडियावर तो सक्रिय नाही. पण तो विविध नेटवर्किंग साइटवरून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.नमिष म्हणाला, “फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपसारख्या माध्यमांद्वारे चाहत्यांशी संपर्क साधण्याऐवजी मी त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय घेतला. माझे चाहते हे माझ्या विस्तारित कुटुंबाचाच एक भाग असून त्यांनी आजवर माझ्यावर बिनशर्त प्रेमाचा वर्षाव केला आहे. मला त्यांच्याशी सतत संपर्क ठेवता येत नाही, याचं मला वाईट वाटतं. या अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी मी आता देशभराचा दौरा काढला असून त्यात मी निदान 51 चाहत्यांची भेट घेईन. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मी त्यांना खुश करीन. जे चाहते भारतात नसतील, त्यांची मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भेट घेईन.”

एक्कावन ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. या मालिकेची संकल्पना ही आजच्या इतर मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या मालिकेतील नायिका ही टॉम बॉय असून तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिचे वडील, काका, मामा आणि आजोबा यांनी मिळून तिचा सांभाळ केला आहे. या मालिकेत प्राची तेहलान मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या आधी तिने 'दिया और बाती' या मालिकेत काम केले होते. एक्कावन या मालिकेतील प्राचीच्या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.एक्कावन या मालिकेत नमिष तनेजा एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता नमिषचा एक नवा अवतार प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नमिष तनेजा म्हणजेच सत्या कॉलेजमधील स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी भगवान शिव यांचे रूप धारण करणार आहे. 

Web Title: Namish Taneja will be a gift to 51 fans across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.