​नकुशी... तरीही हवीहवीशी या मालिकेत नकुशी देणार रणजितला अँगर मँनेजमेंटचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:52 IST2017-03-07T12:22:03+5:302017-03-07T17:52:03+5:30

नकुशी... तरीही हवीहवीशी ही मालिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत उपेंद्र लिमये रंगवत असलेली रणजित शिंदे ही ...

Nakushi ... will still be able to do this in the series. | ​नकुशी... तरीही हवीहवीशी या मालिकेत नकुशी देणार रणजितला अँगर मँनेजमेंटचे धडे

​नकुशी... तरीही हवीहवीशी या मालिकेत नकुशी देणार रणजितला अँगर मँनेजमेंटचे धडे

ुशी... तरीही हवीहवीशी ही मालिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत उपेंद्र लिमये रंगवत असलेली रणजित शिंदे ही भूमिका तर प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. या मालिकेद्वारे उपेंद्रने कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्यामुळे उपेंद्रदेखील त्याची ही भूमिका खूप एन्जॉय करत आहे. या मालिकेत रणजित हा नेहमी चिडणारा, लोकांना रागाच्या भरात काहीही बोलणारा असा दाखवला आहे.
रणजितच्या अशा वागण्याने त्याच्या चाळीत राहाणारे सगळेजण त्याला खूप घाबरतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून कोणावरही चिडणे, तसेच कोणाला काहीही बोलणे असा त्याचा स्वभाव आहे. या स्वभावात काहीच फरक पडत नसल्याने त्याच्या रागावर नियंत्रण आणण्याचे आता नकुशीने ठरवले आहे. 
नकुशी चाळीत राहाणाऱ्या लोकांच्या मदतीने रणजितच्या रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. चाळीतील लोकांनादेखील नकुशीचा हा निर्णय आवडला आहे आणि ते देखील रणजितचा रागावर ताबा मिळवण्यासाठी विविध युक्त्या सुचवत आहेत. यामुळे रणजित राग नियंत्रण मोहिमच चाळीत सुरू झाली आहे. नकुशीने रणजितकडे तो कधीही चिडचिड करणार नाही असे वचनच मागितले आहे. खरे तर असे वचन ऐकल्यानंतर रणजितला सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण नंतर त्याने तिला हे वचन दिले. आता तो हे वचन पाळतो की नाही हे पाहाणे मनोरंजक ठरणार आहे. 
चिडचिड करणार नाही हे रणजितने वचन दिल्यावर चाळातील लोकांनीदेखील त्याची टर खेचण्याचे ठरवले आहे. त्याला राग येईल अशा गोष्टी त्यांनी मुद्दामून करायला सुरुवात केल्या आहेत. त्यामुळे चाळीत एक वेगळीच धमाल-मस्ती सुरू आहे. नकुशीच्या या प्रयत्नामुळे आपला तापट स्वभाव आपल्याला किती घातक होता याची जाणीव रणजितला होते की नाही हे आपल्याला लवकरच कळेल. 

Web Title: Nakushi ... will still be able to do this in the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.