नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी मालिकेतील नायिकांचा झाला मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 15:05 IST2017-08-03T09:35:00+5:302017-08-03T15:05:00+5:30
टेलिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक ...
नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी मालिकेतील नायिकांचा झाला मेकओव्हर
ट लिव्हिजन मालिका सुरू झाली, की त्यातल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात हळहळू घर करतात, त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कोरली जाते. प्रेक्षक त्यांना फॉलो करतात. त्यांची लकब आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे रंगभूषा, वेशभूषा यांचे अनुकरण केले जाते आणि तीच फॅशन लोकांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे मालिकेतील व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यानंतर सहसा त्यांचा लूक बदलला जात नाही. मात्र स्टार प्रवाह वाहिनीने एक वेगळा प्रयोग केला असून सर्वच मालिकांच्या नायिका आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. फक्त नव्या रूपात नाही, तर त्यांचा मेकओव्हर झाला असून या नायिका आता अधिकच ग्लॅमरस अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
मालिकेतील नायिकांच्या हेअरस्टाईल, कपडे, दागिने, त्यांचे स्टाईल स्टेटमेंट याची सगळ्याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. नकुशी मधील नकुशी, गोठ मधील राधा, दुहेरी मधील सोनिया, लेक माझी लाडकी मधल्या मीरा आणि सानिका, कुलस्वामिनी मधील आरोही या व्यक्तिरेखांचा मेकओव्हर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मेकओव्हर कथानकाची आणि त्यांच्या भूमिकांची गरज म्हणून करावा लागला आहे. या मेकओव्हरने या सर्वच नायिका आता मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. याची दखल सोशल मीडियातून देखील घेतली जात असून या नायिकांचे नवे रूप फेसबुक आणि व्हॉटसअॅप पोस्टमधून व्हायरल होत आहे.
या सर्व नायिकांचा मेकओव्हर का झाला, कथानकामध्ये असे काय वळण आले की मेकओव्हर करावा लागला या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नकुशी, गोठ, लेक माझी लाडकी, दुहेरी आणि कुलस्वामिनी या मालिकेत प्रेक्षकांना मिळणार आहेत.
Also Read :