नागिन फेम शरिका रैनाने केले शब्बीर आहुवालियाच्या भावाशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 14:28 IST2017-05-22T08:58:54+5:302017-05-22T14:28:54+5:30
शब्बीर आहुवालिया हे आज छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध नाव आहे. तो सध्या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करत आहे. ...

नागिन फेम शरिका रैनाने केले शब्बीर आहुवालियाच्या भावाशी लग्न
श ्बीर आहुवालिया हे आज छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध नाव आहे. तो सध्या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करत आहे. त्याचा भाऊ समीर देखील याच इंडस्ट्रीत काम करतो. त्याने नुकतेच शरिका रैनासोबत काम केले. शरिका नागिन मालिकेत काम करत होती. शरिका आणि समीर यांची भेट नागिन या मालिकेच्या सेटवरच झाली होती. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. गेल्याच महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. विशेष म्हणजे समीर आणि शरिका यांनी दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले. त्यांनी ख्रिश्चन आणि काश्मिरी या दोन्ही पद्धतीने लग्न केले.
शब्बीर आहुवालियाने समीर आणि शरिका यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. शरिकाने त्याची आणि समीरची प्रेमकथा नुकतीच सांगितली होती. या दोघांच्या प्रेमकथेविषयी शारिकाने सांगितले होते की, "एका मालिकेचे चित्रीकरण राजस्थानमध्ये करत असताना माझी समीरशी ओळख झाली. तो त्या मालिकेच्या प्रोडक्शन कंपनीत सुपरव्हायझर प्रोड्युसर म्हणून काम करत होता. त्याच्या कामाची पद्धत पाहून मी त्याच्या प्रेमात पडली. तो त्याच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशिनेट आहे. त्याची हीच गोष्ट मला आवडली. एके दिवशी मालिकेचे चित्रीकरण संपायला खूपच वेळ झाला होता. त्यावेळी सेटवरच्या ज्या व्यक्तींकडे स्वतःच्या गाड्या नव्हत्या, त्यांची जाण्याची व्यवस्था त्याने स्वतः करून दिली होती. लोकांना मदत करण्याचा त्याचा हा स्वभाव मला खूप आवडला. यामुळे आमच्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला मी त्याला माझ्या कुटुंबीयांना भेटवले आणि समीरला भेटून माझ्या घरातील सगळेच खूश झाले. माझ्या घरातल्यांनी माझ्या पसंतीला होकार दिला. मी समीरला प्रपोज तर खूपच छान स्टाइलमध्ये केले आहे. त्याच्या वाढदिवसाला मी त्याला एका कॉफी शॉपमध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर बरोबर रात्री बारा वाजता मी गुडघ्यावर बसून त्याला प्रपोज केले होते."