r /> गणवेश, शासन, दुनियादारी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटामध्ये नागेश भोसले यांनी उत्तम अभिनय केल्यानंतर त्यांनी पन्हाळÞा चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन के ले आता पुन्हा एकदा ते नाती-खेळ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या निमित्ताने सिएनएकसशी बोलताना दिग्दर्शक म्हणाले की चित्रपटाचे कथानक हे एका सुखवस्तु कुटुुंबाशी संबधित आहे. लहानपणा पासुन छोटया भावाला आवडणारी मुलगी जेव्हा मोठया भावाची बायोक बनून आल्यानंतर घरात काय काय घडामोडी घडतात आणि जेव्हा ही गोष्ट चव्हाटयावर येते तेव्हा गावचे पंच,गावकरी काय निर्णय घेतात हे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटा मध्ये केला आहे. नाती - खेळ या चित्रपटामध्ये मिलींद शिंदे, उमेश जगताप, माधव अभ्यंकर, राधा कुलकर्णी, प्रफुल्ल कांबळे, विद्यासागर अध्यापक, प्रकाश धात्रे, दिलीप घारे हे मुख्य भुमिक ा साकारताना दिसणार आहे. चला तर मग नागेश भोसले यांना आपण नाती- खेळ या चित्रपटासाठी शुभेच्छा देऊया.