नागेश भोसले ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ मालिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:20 AM2019-07-17T11:20:41+5:302019-07-17T11:22:37+5:30

मालिकेच्या नवीन भागात, सदाशिव शिर्डीतील लोकांना साईंची उपासना करण्यापासून परावृत्त करुन शास्त्रात सांगितलेला मार्ग अवलंबण्यास तयार करण्यासाठी कसे प्रयत्न करतो ते दाखवले जाणार आहे.

Nagesh Bhonsle to be a part of Mere Sai- Shraddha aur Saburi | नागेश भोसले ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ मालिकेत झळकणार

नागेश भोसले ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ मालिकेत झळकणार

googlenewsNext

सुरुवातीपासूनच ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ ही मालिका एक प्रमुख मालिका बनली आहे आणि प्रेक्षकांचे प्रेम संपादन करत आहे. मनोरंजक कथा आणि मौल्यवान शिकवण याव्यतिरिक्त, लोकप्रिय व्यक्तिरेखा समाविष्ट करण्यासाठी ही मालिका कायमच प्रकाशझोतात राहिली आहे. केतकी दवे पासून किशोरी गोडबोलेपर्यंत कलाकारांबरोबर आता प्रसिद्ध अभिनेता नागेश भोसलेचा यात समावेश असेल. 

 

अभिनेता नागेश भोसलेने ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ आणि अशा अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. ‘बिल्लू’, ‘क्यूँ की’ आणि ‘शूल’ या हिंदी चित्रपटांतील प्रमुख भूमिकांद्वारे इंडस्ट्रीत आपले वेगळे प्रस्त निर्माण केले आहे. तसेच ‘हॉटेल मुंबई’ या हॉलीवुड चित्रपटातही भूमिका केली आहे. आता ‘मेरे साई’ मालिकेत नागेश ईश्वराचा सच्चा भक्त असलेला आणि सनातनी ‘सदाशिव’ या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.
 
नागेशने धार्मिक, धर्माभिमानी आणि अत्यंत श्रद्धाळू असे त्याच्या व्यक्तिरेखेचे वर्णन केले. तो म्हणाला, 'मेरे साई’ मालिकेत सुरूवातीला माझी व्यक्तिरेखा साई बाबांची भक्त दाखवलेली नाही. तो शास्त्रांचा कट्टर अनुयायी आहे आणि शिर्डीतील लोक साईंची भक्ती करतात हे त्याला  अमान्य आहे.” तो पुढे म्हणाला,“माझी व्यक्तिरेखा लोकांना काशीला आणि इतर धर्मास्थळांना भेट देण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करते आणि हजारो वर्षांपासून धर्माचा एक भाग असलेल्या देवतांच्या पारंपरिक मूर्तीची उपासना करायला सांगते.” नागेश साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या, धर्मावरील विश्वास आणि उपासना करण्याची पद्धत याबद्दलच्या कल्पना ठाम आहेत, त्यामुळे परंपरागत देवतांची उपासना करण्याऐवजी शिर्डीत होत असलेले जिवंत माणसाचे पूजन त्याला पटत नाही. 
 
मालिकेच्या नवीन भागात, सदाशिव शिर्डीतील लोकांना साईंची उपासना करण्यापासून परावृत्त करुन शास्त्रात सांगितलेला मार्ग अवलंबण्यास तयार करण्यासाठी कसे प्रयत्न करतो ते दाखवले जाईल. देव सर्वव्यापी आहे या संकल्पनेवर विश्वास ठेवण्या ऐवजी लोकांनी मूर्तीपूजा करावी तसेच धार्मिक स्थळांना भेट द्यावी असे त्याला वाटते. 

या लोकप्रिय मालिकेमध्ये काम करण्याबाबत त्याच्या भावनांबद्दल विचारले असता तो म्हणाला, “‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ मालिकेत काम करण्यास मी उत्सुक आहे. ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे ज्यात आधुनिक समाजाशी निगडीत साई बाबांची मोलाची शिकवण सांगितली आहे. साई बाबा, बायजा बाई आणि इतर बर्‍याच व्यक्तिरेखा आधीच प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्यांनी प्रेक्षकांचे प्रेम संपादन केले आहे अशा मालिकेत काम केल्याने माझा लाभच होईल.” 
 

Web Title: Nagesh Bhonsle to be a part of Mere Sai- Shraddha aur Saburi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.