​नच बलिये स्पर्धक दिव्यांका त्रिपाठीने दिले नेटिझन्सना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 16:48 IST2017-06-19T11:18:52+5:302017-06-19T16:48:52+5:30

नच बलिये 8 या कार्यक्रमाचे फायनल लवकरच होणार आहे. या कार्यक्रमात नुकत्याच तीन स्पर्धकांची अंतिम टप्प्यासाठी निवड करण्यात आली ...

Nachin Boleen Contestant Diwali Tripathi gave the answer to Netizhana | ​नच बलिये स्पर्धक दिव्यांका त्रिपाठीने दिले नेटिझन्सना उत्तर

​नच बलिये स्पर्धक दिव्यांका त्रिपाठीने दिले नेटिझन्सना उत्तर

बलिये 8 या कार्यक्रमाचे फायनल लवकरच होणार आहे. या कार्यक्रमात नुकत्याच तीन स्पर्धकांची अंतिम टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये सान्या इराणी-मोहित सेहगल, सनम-अबिगल पांडे, दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया यांचा समावेश आहे. सध्या हे तिन्ही स्पर्धक आपल्या नृत्यावर अतिशय मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाचा फिनाले लवकरच होणार असून या तिघांमधून एक जोडी नच बलियेची विजेची जोडी ठरणार आहे.
दिव्यांका त्रिपाठी ये है मोहोब्बते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील ती साकारत असलेली इशिता ही भूमिका प्रेक्षकांची सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे प्रेक्षक दिव्यांकाशिवाय ये है मोहोब्बते या मालिकेचा विचारही करू शकत नाहीत. पण नच बलिये आणि ये है मोहोब्बते ही मालिका स्टार प्लस या वाहिनीवर दाखवण्यात येते. त्यामुळे नच बलिये या कार्यक्रमाचे विजेतेपद स्टार प्लस वाहिनीने दिव्यांकाला न दिल्यास ती ये है मोहोब्बते ही मालिका सोडेल अशी तिने वाहिनीला धमकी दिली असल्याची बातमी कित्येक दिवसांपासून येत आहे. या बातमीवरून सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सुरुवातीला दिव्यांकाने या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केले होते. पण आता दिव्यांकाने लोकांना उत्तर देण्याचे ठरवले आहे. तिने नुकतेच यावरून एक ट्वीट केले आहे. तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चुकीच्या बातम्यांकडे लक्ष देणाऱ्या लोकांसाठी मी हे उत्तर देत आहे. मी नच बलियेची विजेती ठरो अथवा नाही पण काहीही झाले तरी ये है मोहोब्बते ही मालिका मी सोडणार नाहीये. 

Web Title: Nachin Boleen Contestant Diwali Tripathi gave the answer to Netizhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.