द कपिल शर्मा शोच्या सेटवर ऋषी कपूर यांनी उलगडले हे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:32 IST2017-02-10T12:02:46+5:302017-02-10T17:32:46+5:30

ऋषी कपूर आणि नितू सिंग हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक रोमँटिक कपल मानले जाते. या दोघांनी नुकतीच द कपिल शर्मा ...

The mystery that Rishi Kapoor unveiled on the set of The Kapil Sharma show | द कपिल शर्मा शोच्या सेटवर ऋषी कपूर यांनी उलगडले हे रहस्य

द कपिल शर्मा शोच्या सेटवर ऋषी कपूर यांनी उलगडले हे रहस्य

ी कपूर आणि नितू सिंग हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक रोमँटिक कपल मानले जाते. या दोघांनी नुकतीच द कपिल शर्मा शोच्या सेटवर भेट दिली. यावेळी ऋषी आणि नितूने या दोघांच्या आयुष्यातील वैयक्तिक आयणि व्यवसायिक गोष्टींवर खूप गप्पा मारल्या. नीतू सिंग यांचे पती ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर हे दोघेही अभिनेते आहेत. या दोघांमध्ये अधिक चांगला अभिनेता कोण असे नितू सिंग यांना विचारत कपिल शर्माने त्यांच्यावर गुगलीच टाकली. तसेच यावेळी ऋषी कपूर यांनी एक रहस्य उडगडले.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या आय़ुष्यावर खुल्लम खुल्ला हे आत्मचित्र लिहिले असून या आत्मचरित्राची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. या पुस्तकात ऋषी कपूरने स्वतःच्या आणि राज कपूर यांच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलगडली आहेत. या पुस्तकावर आधारित एक स्टेज शो ऋषी करणार असल्याचे त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले. 16 मार्चला मुंबईत हा स्टेज परफॉर्मन्स सादर केला जाणार आहे. त्यांच्यामते पुस्तक वाचणे आणि त्या पुस्तकावर आधारित लाइव्ह परफॉर्मन्स पाहाणे हे दोन वेगळे अनुभव आहेत. पुस्तक वाचताना तुम्ही त्या पुस्तकात तल्लीन होतात तर लाइव्ह परफॉर्मन्स पाहाताना तुम्ही तो एन्जॉयदेखील करतात. या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी तालमी करायलादेखील त्यांनी सुरुवात केली आहे. 
ऋषी कपूरने या लाइव्ह परफॉर्मन्सबद्दल सांगितल्यावर सगळेच खूप खूश झाले. एवढेच नव्हे तर द कपिल शर्मा शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने देखील या परफॉर्मन्सबाबतची आपली उत्सुकता व्यक्त केली आणि त्याला हा परफॉर्मन्स एन्जॉय करायला आवडेल असे सांगितले. 

Web Title: The mystery that Rishi Kapoor unveiled on the set of The Kapil Sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.