Myra Vaikul : मायराच्या गाडीवर आले माकड; चाहते म्हणतात ऑटोग्राफ दे...व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:08 PM2022-12-23T13:08:05+5:302022-12-23T13:10:16+5:30

मायराचे आई बाबा सोशल मीडियावर सतत तिचे व्हिडिओ, रील्स, ब्लॉग पोस्ट करत असतात. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका ब्लॉगमध्ये मायराची धमाल मस्ती दिसून येतेय.

myra-vaikul-video-viral-monkey-jump-on-her-car-fans-says-give-him-autograph | Myra Vaikul : मायराच्या गाडीवर आले माकड; चाहते म्हणतात ऑटोग्राफ दे...व्हिडिओ व्हायरल

Myra Vaikul : मायराच्या गाडीवर आले माकड; चाहते म्हणतात ऑटोग्राफ दे...व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

Myra Vaikul :  माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgaath)  मालिकेतून प्रेक्षकांची एका गोड परीशी गोड झाली. ती परी म्हणजेच मायरा वायकुळ (Myra Vaykul). मायराचं हसणं, बोलणं, अभिनय करणं हे सगळंच प्रेक्षकांना खूप आवडतं. बघता बघता मायरा संपूर्ण महाराष्ट्राचीच लाडकी परी झाली. मायराचे आई बाबा सोशल मीडियावर सतत तिचे व्हिडिओ, रील्स, ब्लॉग पोस्ट करत असतात. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका ब्लॉगमध्ये मायराची धमाल मस्ती दिसून येतेय.

...आणि मायराच्या गाडीवर चढले माकड

सध्या मायरा कुटुंबासोबत सुट्टी एंजॉय करताना दिसत आहे. माऊंट अबूमध्ये एंजॉय करतानाचा मायराचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये मायरा तिच्या कुटुंबासोबत कारमध्ये बसली आहे. तर ४ माकडं रस्त्याच्या कडेला बसलेली दिसत आहेत. अचानक एक माकड कारवर चढते आणि बघता बघता सगळीच माकडं त्यांच्या कारजवळ येतात. मायराला हे बघून फार मजा येत असल्याचं दिसतंय.

माकडाला मायराचा ऑटोग्राफ पाहिजे वाटतं अशी भन्नाट कमेंट चाहते करत आहेत. मायराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे ती अजून खूप लहान आहे तरी तिचा चाहतावर्ग आतापासूनच इतका मोठा आहे. मायरा आणि तिच्या आईचे ट्विनिंग फोटो चाहते खूप पसंत करतात.

Web Title: myra-vaikul-video-viral-monkey-jump-on-her-car-fans-says-give-him-autograph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.