माझे लग्न दिखावा नाही; मोनालिसाने करण जोहरला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 16:39 IST2017-01-25T11:09:52+5:302017-01-25T16:39:52+5:30

बिग बॉसच्या घरात बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूत याच्याबरोबर धूमधडाक्यात लग्न लावणाºया मोनालिसाच्या लग्नावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया करण जोहर याला ...

My wedding is not showing off; Monalya told Karan Johar | माझे लग्न दिखावा नाही; मोनालिसाने करण जोहरला सुनावले

माझे लग्न दिखावा नाही; मोनालिसाने करण जोहरला सुनावले

ग बॉसच्या घरात बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूत याच्याबरोबर धूमधडाक्यात लग्न लावणाºया मोनालिसाच्या लग्नावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया करण जोहर याला तिने उत्तर दिले आहे. ‘मी घरात रिअल लग्न केले दिखावा नाही’ अशा शब्दात तिने करण जोहरला सुनावले आहे. 

भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस मोनालिसाला आपल्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत तिला सिनेमात काम देणार असल्याचे अनाउन्स करणाºया करण जोहरने ‘तिचे लग्न जेवढे दिवस टिकेल त्यापेक्षा माझा तिच्याशी असलेला कॉन्ट्रॅक्ट अधिक काळ टिकेल’ असे म्हटले होते. ही बाब मोनालिसाला समजताच तिने करण सर असे म्हणूच कसे शकतात, असे म्हणत मी रिअल लग्न केल्याचे स्पष्ट केले आहे. 

बिग बॉसच्या घरात विक्रांतसोबत लग्न लावण्यासाठी मोनालिसा आणि विक्रांतला भरपूर पैसा दिला गेल्याचे बोलले जात होते. त्यात करण जोहर याने तिच्या लग्नावरून वादग्रस्त वक्तव्य करून त्यात भर टाकली होती. याचाच समाचार घेताना तिने करण जोहरला खोटं ठरविले आहे. मोनालिसा म्हणाली की, इतर लोकांप्रमाणे करण सर यांनीदेखील म्हटले की, हे लग्न नसून स्टंट आहे. हे ऐकून मला खरोखरच खूप वाईट वाटले. माझ्यासाठी हे लग्न खूपच स्पेशल आहे. मी आणि विक्रांत गेल्या आठ वर्षांपासून एकत्र राहत आहोत. फक्त आम्ही विवाहबंधनात अडकलेलो नव्हतो एवढेच! आम्ही लग्न करण्याचा यापूर्वी विचारही केला होता, मात्र योग आला नव्हता. या लग्नाला आमच्या परिवारातील सर्वांचा पाठिंबा असल्याचेही तिने स्पष्ट केले. 

मोनाने पुढे बोलताना म्हटले की, आम्ही लग्न केले नव्हते तरीदेखील इंडस्ट्रीमधील लोक आम्हाला विवाहित समजत असत. बºयाच वेळा तू विक्रांतची पत्नी आहेस का? असे मला विचारले गेले. त्यांना मी नकार देत असे; मात्र त्याचबरोबर आम्ही धूमधडाक्यात लग्न करणार असल्याचेही सांगत असे. अशात जेव्हा आम्हाला बिग बॉसने स्क्रीनवर लग्न करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही दोघांनीही लगेचच त्यास होकार दिला. आम्ही जगासमोर लग्न केले, त्यामुळे आमच्या लग्नाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचेही तिने सांगितले. 



बिग बॉसच्या घरात मोनालिसाचा प्रवास खूपच रोमॅण्टिक असा राहिला. सुरुवातीला मनू पंजाबी यांच्याबरोबर केमिस्ट्री जुळलेल्या मोनालिसाने नंतर बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याच्यासोबत लग्न केले; मात्र तिला फिनालेपर्यंत मजल मारता आली नाही. गेल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरातील तिचा प्रवास संपला आहे. सध्या ती तिच्या सासरला असून, पती विक्रांत सिंह राजपूत याच्याबरोबर आनंदी जीवन जगत असल्याचे तिच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

Web Title: My wedding is not showing off; Monalya told Karan Johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.