‘म्युझिक थेरपी’ने लोकांना बरे करायचे आहे - जगप्रीत बाजवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 17:22 IST2016-07-07T11:52:48+5:302016-07-07T17:22:48+5:30
‘सारेगामापा’ या रिआॅलिटी शोचा स्पर्धक जगप्रीत बाजवा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. दृष्टीहीन असलेला जगप्रीत संगीताच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात ...

‘म्युझिक थेरपी’ने लोकांना बरे करायचे आहे - जगप्रीत बाजवा
कॅनेडात राहताना हिंदूस्थानी संगीताकडे कसा वळलास?
- माझे आई-वडील मागील 25 वर्षांपासून कॅनेडात राहत आहेत. आमच्या घरचे वातावरण थेट हिंदूस्थानी आहे. माझे पालक म्हणतात, तू इंग्रजी तर बाहेर किंवा शाळेत शिकशील, मात्र घरी तुला हिंदी किंवा पंजाबीमध्येच बोलावे लागेल. यामुळे भारतीय संस्कृती व भाषा आमच्या घरीच शिकायला मिळाली. याचमुळे मला भारतीय संगीतचा लळा लागला.
जगप्रीत तू 11 भाषांत गाणे गातो, या भाषा तू शिकला की केवळ गाणे गातो?
- मी 13 भाषांंमध्ये गातो, यात जास्तीत जास्त भारतीय भाषा आहेत. हिंदी, तामीळ, पंजाबी, गुजराती, संस्कृ त, ऊर्दूतील गाणी गातो. विदेशी भाषांत इंग्रजी, इटालिअन, फ्रें च, स्पेनिश, जर्मन या भाषांतही गाणी गायली आहेत. या सर्व भाषातील गाणीच गातो, त्या भाषा शिकल्या नाहीत.
‘सारेगामापा’ व संगीत क्षेत्रातला आतापर्यंतचा अनुभव कसा आहे?
- माझी आई नागपूरची असल्याने या शहराबद्दल मला विशेष आकर्षण आहे. मी येथे नेहमीच येत असतो. यावेळी मी मुंबईत राहण्याचा विचार केला. अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासमोर आपले गाणे गायले. काही लोकांनी मला येथे आणखी काही काळ थांबण्याचा सल्ला दिला. मी देखील काहीतरी काम मिळावे याचा प्रयत्न करीत होतो. सहा महिन्यानंतर जुही चावलांच्या एका चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. याच वेळी सारेगामापाचे आॅडिशन सुरू झाले. हा शो मी लहानपणापासून पाहतच होतो. ते माझे स्वप्न होते. मलाही यात भाग घ्यायचा होता. या शोचा भाग असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. लोक माझ्यावर खूप प्रेम करीत आहे.
या कार्यक्रमात तुझा सर्वांत मोठा कॉम्प्टिटर कोण?
- माझ्या मते सर्वच प्रतिस्पर्धी चांगले आहेत. सर्वच व्हेर्सेटाईल आहेत, विजेता जनता ठरविणार आहे, पाहूया लोकांचे प्रेम कुणाल मिळते.
तू म्युझिक थेरपी स्कूल सुरू करणार आहेस असे एैकण्यात आहे, हा विचार कसा आला?
- नुकतेच एक संशोधन समोर आले आहे, त्यानुसार 20 ते 30 आजारांवर म्यूझिक थेरपीच्या माध्यमातून उपचार केला जाऊ शकतो. आणखी काही आजारांवर असे उपचार व संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे, लहान बहिनही डॉक्टर बनू इच्छिते. मी एक दिवस वडिलांना सहजच विचारले, मी डॉक्टर होऊ शकतो काय? ते म्हणाले, होय, नक्कीच. तू संगीताच्या माध्यमातून लोकांचे उपचार करू शकतो. मग काय याचा मी अभ्यास सुरू केला. ही अशी सुरुवात झाली.
तुझे हे म्युझिक थेरपी स्कूल कुठे असेल?
- अर्थातच भारतातच हे सुरू करण्याचा विचार आहे. माझ्या देशासाठी काहीतरी करायचे आहे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ठरेल. भारतात मोठ्या संख्येने लोक तणावाचे जीवन जगत आहेत. यामुळे डिप्रेशन सारख्या आजाराचे ते बळी ठरतात. लोक खुल्या मनाने बोलत नाहीत. त्यांचे विचार मनात घुटमळत असतात. संगीताच्या माध्यमातून त्यांचा तणाव कमी करता येतो. याशिवाय मला चॅरेटी करायची आहे. ‘मिका पाजी’ (मिका सिंग) यांनी मला बरेच इम्प्रेस केले. मला गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चॅरीटी करायची आहे.
तुझ्यावर प्रेम करणाºया मुलींची संख्या मोठी आहे. तुझी ड्रिम गर्ल कशी असेल?
- (लाजून) ती माझ्यासारखी असावी. साधी, डाउन टू अर्थ, जसा विचार मी करतो तशाच तिच्या भावना असाव्या. केवळ माझ्या नावावर किंवा पैशामुळे तीचे माझ्यावर प्रेम नसावे. तीचे प्रेम खरे असावे.
नागपूरात मिळाले ‘खास गिफ्ट’
लोकमत भवनाला दिलेल्या भेटीत जगप्रीतने खासदार व लोकमत एडिटोरिअल बोेर्डाचे चेअरमॅन विजय दर्डा यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्याने ‘अग्नीपथ’ या चित्रपटातील ‘ओ सय्या’ हे गीत गायले. त्याच्या गाण्याने प्रभावित झालेल्या विजय दर्डा यांनी लगेच या गाण्याचे मूळ गायक रूप कुमार राठोड यांना फोन लावून जगप्रीतशी थेट संवाद साधला. रूप कुमार राठोेड यांनी जगप्रीतची प्रशंसा केली व त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ध्यानी मनी नसताना दिग्गज गायकाशी संवाद साधण्याची व त्याचा आशीर्वाद मिळल्याने ‘लोकमत’ने मला हे ‘खास गिफ्ट’ दिले असल्याचा उल्लेख जगप्रीतने केला.
- वीरेंद्रकुमार जोगी