'सुंदरी... सुंदरी...' गाण्यावर 'मुरांबा' मालिकेतील रमाचा जलवा! शिवानी मुंढेकरचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:10 IST2025-11-21T13:09:52+5:302025-11-21T13:10:51+5:30
लोकप्रिय मालिका 'मुरांबा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) जी मालिकेत 'रमा' ही मुख्य भूमिका साकारत आहे, ती सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

'सुंदरी... सुंदरी...' गाण्यावर 'मुरांबा' मालिकेतील रमाचा जलवा! शिवानी मुंढेकरचा व्हिडीओ व्हायरल
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) जी मालिकेत 'रमा' ही मुख्य भूमिका साकारत आहे, ती सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. शिवानीने प्रसिद्ध गायक संजू राठोड याच्या 'सुंदरी... सुंदरी...' या सुपरहिट आणि ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केला असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
संजू राठोडचे 'सुंदरी... सुंदरी...' हे गाणे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे. आता या गाण्याने रमा म्हणजेच शिवानी मुंढेकरला चांगलीच भुरळ घातली आहे. तिने आपल्या खास शैलीत नृत्य सादर केले. तिच्या या व्हिडीओमध्ये 'मुरांबा' मालिकेतील रमाला एक वेगळा, बिनधास्त अंदाज बघायला मिळत आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट
'मुरांबा' मालिकेमुळे शिवानी मुंढेकरची लोकप्रियता वाढली आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या गाण्यांवरील तिचे रील्स नेहमीच व्हायरल होत असतात. 'सुंदरी... सुंदरी...' गाण्यावरील हा डान्स व्हिडीओ तिच्या फॉलोअर्ससाठी एक खास पर्वणी ठरला आहे, ज्यामुळे तिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
'मुरांबा' मालिका
'मुरांबा' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. यात एकीकडे रमा आणि अक्षय यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आजी पार्वती आणि लेक आरोही प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे साईचा गैरसमज झाला आहे की, रमाने त्याला लग्नासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार आहे, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.