'मुरांबा' फेम अभिनेत्रीचं जीममध्ये जबरदस्त वर्कआऊट, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:50 IST2025-02-11T16:50:29+5:302025-02-11T16:50:45+5:30
'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये निशाणी जबरदस्त वर्कआऊट करताना दिसत आहे.

'मुरांबा' फेम अभिनेत्रीचं जीममध्ये जबरदस्त वर्कआऊट, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्
कलाकार त्यांच्या फिटनेसकडे कायमच विशेष लक्ष देताना दिसतात. फिट राहण्यासाठी डाएटसोबतच कलाकार वर्कआऊटही करतात. याचे व्हिडिओ आणि फोटोही कलाकार शेअर करत असतात. बॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाकारही त्यांच्या फिटनेसकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
'मुरांबा'मध्ये रेवाची भूमिका साकारून अभिनेत्री निशाणी बोरुले घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली व्हिलनची भूमिका प्रेक्षकांना आवडली. निशाणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वैयक्तिक जीवनातील गोष्टी आणि नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स ती चाहत्यांना सोशल मीडियावरुन देत असते. नुकतंच निशाणीने जीममधील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे.
निशाणी तिच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देताना दिसते. तिने शेअर केलेल्या जीम व्हिडिओमध्ये निशाणी जबरदस्त वर्कआऊट करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. "जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा हे घडतं. आजूबाजूच्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे.