'मुरांबा'फेम मराठी अभिनेत्रीचा हिटमॅनसोबत फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:56 PM2024-04-30T12:56:26+5:302024-04-30T12:57:17+5:30

मुरांबा मधल्या अभिनेत्रीने रोहित शर्मासोबत खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात (rohit sharma, muramba)

muramba actress kajal kate photo with rohit sharma birthday mumbai indians | 'मुरांबा'फेम मराठी अभिनेत्रीचा हिटमॅनसोबत फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

'मुरांबा'फेम मराठी अभिनेत्रीचा हिटमॅनसोबत फोटो, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

सध्या IPL 2024 ची चांगलीच चर्चा आहे. भारतातील आणि परदेशातील दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांसमोर तुल्यबळ झुंज देत आहेत. यंदाचा IPL चा सीझन खास आहे. कारण अनेक संघ प्रत्येक सामन्यात तुफान बॅटींग करत २०० च्या वर रन्स करत आहेत. अशातच यावेळी मुंबई इंडियन्सचा संघही चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पंड्याला कॅप्टन करणं, अनेक सामने गमावणं अशा विविध गोष्टींमुळे मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या IPL मध्ये चर्चा आहे. अशातच आज भारताचा आघाडीचा फलंदाज आणि मुंबई इंडियन्स टीमचा आधारस्तंभ रोहित शर्माचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मराठमोळी अभिनेत्री काजल काटेने रोहितला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात.

काजलने रोहितसोबतचा फोटो शेअर केलाय. यात रोहित एकदम कॅज्युअल अंदाजात बघायला मिळतोय. काजलने हा फोटो शेअर करुन Wish you a very Happy Birthday Rohit असं कॅप्शन लिहिलंय. काजलने रोहितसोबतचा हा फोटो पोस्ट करण्यामागे खास कारण आहे. काजलचा नवरा प्रतीक कदम हा मुंबई इंडियन्स संघाचा फिटनेस कोच आहे. यानिमित्ताने काजल काहीच दिवसांपुर्वी रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघाच्या इतर खेळाडूंना भेटली.

काजल काटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून काजल काटे हे नाव घराघरात पोहोचलं. या मालिकेत प्रार्थना बेहेरेच्या मैत्रीणीची भूमिका काजलने साकारली. ही भूमिका चांगलीच गाजली. काजल सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेत झळकत आहे.काहीच दिवसांपुर्वी 'मुरांबा' मालिकेतील अभिनेत्रींनी सुद्धा रोहित शर्माची भेट घेतलेली.

Web Title: muramba actress kajal kate photo with rohit sharma birthday mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.