'मुलगी झाली हो' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 05:11 PM2021-09-22T17:11:06+5:302021-09-22T17:11:40+5:30

मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे.

Mulgi Zali Ho ho Serial is soon going to feature this famous actress, check how Sharmishtha Raut gonna make her entry | 'मुलगी झाली हो' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

'मुलगी झाली हो' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'मुलगी झाली हो' मालिकेने सुरुवातीपासून रसिकांची पसंती मिळवली होती. दिवसेंदिवस मालिकेतले ट्विस्ट रसिकांना खिळून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत. मालिकेचं कथानक आणि दमदार कलाकारांची फौज यामुळे मालिका रसिकांचीही आवडती बनली आहे. कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं असून मालिकेत आता एका नवीन चेहऱ्याची एंट्री होणार आहे. 


अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालिकेत झळकणार आहे. मालिकेत अशा विलक्षण वळणावर शर्मिष्ठाची एंट्री होणार आहे. नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार असून नीलिमाच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिला असून लग्न करेन तर शौनकशी असं ठामपणे सांगितलं आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी सिद्धांत हार मानायला तयार नाही.

नीलिमाचा वापर करुन तो माऊचे वडिल म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आहे. सिद्धांत आणि नीलिमाचा डाव यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेलच. पण नीलिमा सावंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा नवा अंदाज रसिकांना पाहायला मिळेल.

 


'मन उधाण वाऱ्याचे', 'जुळून येती रेशमीगाठी', 'कुंपण', 'सप्तपदी', 'चार दिवस सासूचे', 'अभिलाषा', 'एक झुंज वादळाशी' यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे. मालिकाच नाहीतर 'दे धक्का', 'फक्त लढ म्हणा', 'चि व चि.सौ.का', 'काकस्पर्श', 'रंगकर्मी', 'योद्धा' यासारख्या सिनेमातही ती झळकली आहे. तसेच 'बिग बॉस मराठी' रिएलिटी शोमध्येही ती झळकली होती. शोमध्ये सहभागी झाल्यामुळे ती प्रचंड चर्चेत होती. 

त्यानंतर शर्मिष्ठा लग्नबंधनात अडकली. तेजस देसाई सोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तेजससोबतचे खास फोटो शेअर करत ती कपल गोलही देत असते.

तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळते. पुन्हा एकदा मालिकेत झळकणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनाही एक वेगळीच उत्सुकता असणार हे मात्र नक्की.

Web Title: Mulgi Zali Ho ho Serial is soon going to feature this famous actress, check how Sharmishtha Raut gonna make her entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.