तुझ्यासोबत आनंदी क्षण घालवायचे आहेत म्हणत मृणाल दुसानीसने शेअर केला पतीसोबतचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 13:42 IST2021-03-03T13:40:57+5:302021-03-03T13:42:21+5:30

मृणालचा पती एखाद्या अभिनेत्याइतकाच सुंदर दिसतो. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

mrunal dusanis shares picture with husband on social media with romantic message | तुझ्यासोबत आनंदी क्षण घालवायचे आहेत म्हणत मृणाल दुसानीसने शेअर केला पतीसोबतचा फोटो

तुझ्यासोबत आनंदी क्षण घालवायचे आहेत म्हणत मृणाल दुसानीसने शेअर केला पतीसोबतचा फोटो

ठळक मुद्देमृणाल आणि तिच्या पतीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ चार तासांत 16 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

मृणाल दुसानीस सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती आणि आता तिने तिच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मृणालने पतीसोबत फोटो पोस्ट करत छान कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, नेहमीच तक्रार करण्याची काही ना काही कारणं असतात... माझ्या आयुष्यात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल मी तक्रार करायचे सोडले आहे आणि पुन्हा एकदा आनंदी क्षण घालवायचे ठरवले आहे.

मृणाल आणि तिच्या पतीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ चार तासांत 16 हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. या फोटोत तुम्ही दोघे खूपच क्यूट दिसत आहात असे त्यांचे फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत.

मृणालच्या नवऱ्याचे नाव नीरज असून 25 फेब्रुवारी 2016 ला दोघांनी लग्न केले. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने मृणाल लग्नबंधनात अडकली. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल काही महिने भारतात तर काही महिने अमेरिकेत राहाते.

मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी मृणालची ओळख निर्माण झाली आहे. तिने तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. सुखांच्या सरीने हे मन बावरे या मालिकेमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.

Web Title: mrunal dusanis shares picture with husband on social media with romantic message