नजर या मालिकेतील भूमिकेसाठी मोनालिसा अशी करतेय तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:50 IST2018-07-24T11:47:34+5:302018-07-24T11:50:04+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ या आगामी मालिकेत डायनची प्रमुख भूमिका मोनालिसा साकारणार आहे. ही गोष्ट मोनालिसाने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी तिने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. 

Mona Lisa is preparing for the role in this series of eyes | नजर या मालिकेतील भूमिकेसाठी मोनालिसा अशी करतेय तयारी

नजर या मालिकेतील भूमिकेसाठी मोनालिसा अशी करतेय तयारी

अभिनयासाठी अनेक कलाकार बरीच मेहनत घेतात आणि मोनालिसा ही देखील अशा मेहनती कलाकारांपैकी एक आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ या आगामी मालिकेत डायनची प्रमुख भूमिका मोनालिसा साकारणार आहे. ही गोष्ट मोनालिसाने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी तिने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. 
मोनिकाने आजवर तामिळ, तेलगु, ओरिसा, बंगाली आणि कन्नड भाषेत काम केले आहे. तिचे अनेक भोजपुरी चित्रपट हिट झाले आहेत. बिग बॉस या कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनमध्ये ती झळकली होती. या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती नच बलिये या कार्यक्रमात देखील झळकली होती. आता ती नजर या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यास उत्सुक आहे. नजर या मालिकेतील निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, मोनालिसा प्रथमच एक खलनायिकेची भूमिका साकारत असून तिला या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा आहे. त्यासाठी ती एका खोलीत स्वत:ला बंद करून घेते आणि आपले संवाद पाठ करते. तिची रंगभूषा आणि केशभूषा करून झाली की, ती स्वत:ला खोलीत कोंडून घेते आणि एका आरशासमोर उभे राहून आपले संवाद म्हणते आणि या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करते. असं केल्यामुळे तिला तिच्या व्यक्तिरेखेची अधिक सखोल जाणीव होते आणि तिला नंतरचा प्रसंग कसा साकारायचा, त्याची कल्पना येते.”
‘नजर’ ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. या शहरात राहणाऱ्या राठोड परिवाराच्या अनेक पिढ्यांवर एका डायनची वाईट नजर पडलेली असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन कसे संकटमय होते, त्याची ही कथा आहे.
नजर या मालिकेत मोनालिसा सोबतच स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. या मालिकेचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Mona Lisa is preparing for the role in this series of eyes