मोहित पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:31 IST2016-10-10T05:05:57+5:302016-10-17T10:31:15+5:30
मॉनी रॉय आणि मोहित रैना यांची पहिली भेट देवों के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या ...
.jpg)
मोहित पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">मॉनी रॉय आणि मोहित रैना यांची पहिली भेट देवों के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ही मालिका संपल्यानंतरही आजही त्यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते. मॉनीच्या वाढदिवसालाही मोहित तिच्यासोबतच होता. पण या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल न बोलणेच पसंत केले आहे. त्यांनी कधीही आपण नात्यात असल्याचे मीडियासमोर मान्य केले नाही. पण सध्या ते आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवरून एकमेकांसोबतचे फोटो अपलोड करत असतात. मोहितला नुकताच त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी मी लग्न करणार असल्याचे म्हटले आहे तर मॉनीने या प्रश्नावर मौन राखणेच पसंत केले. मोहितच्या या उत्तरानंतर मोहित आणि मॉनी पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.