एमटिव्ही रोडीजचे पूर्वस्पर्धक मोहित सागर आणि रूप भिंदर यांनी केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 12:21 IST2017-02-23T06:49:10+5:302017-02-23T12:21:22+5:30

एमटिव्ही रोडीज हा कार्यक्रम गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्यावेळी या कार्यक्रमाचा परीक्षक करण कुंद्राने ...

Mohit Sagar and Roop Bhindar, the proprietor of MTV Roadies, said, | एमटिव्ही रोडीजचे पूर्वस्पर्धक मोहित सागर आणि रूप भिंदर यांनी केला साखरपुडा

एमटिव्ही रोडीजचे पूर्वस्पर्धक मोहित सागर आणि रूप भिंदर यांनी केला साखरपुडा

टिव्ही रोडीज हा कार्यक्रम गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्यावेळी या कार्यक्रमाचा परीक्षक करण कुंद्राने एका स्पर्धकाच्या कानाखाली वाजवली तर दुसऱ्या स्पर्धकाला धक्के धरून बाहेर काढले असे म्हटले जात होते. त्यामुळे आता या कार्यक्रमात करण कुंद्राची जागा निखिल चिन्नप्पाने घेतली आहे. पण वादामुळे नव्हे तर व्यग्र शेड्युलमुळे हा कार्यक्रम सोडत असल्याचे करण कुंद्राने म्हटले होते. एमटिव्ही रोडीज आता वादासाठी नव्हे तर एका चांगल्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. 
एमटिव्ही रोडीजचे पूर्वस्पर्धक मोहित सागर आणि रूप भिंदर यांनी नुकताच साखरपुडा केला. या दोघांनी साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. त्या दोघांनी त्यांच्या अंगठीचा फोटो टाकून ही बातमी त्यांच्या फॅन्सना सांगितली आहे.

mohit saggar and roop bhinder
मोहितने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून ही बातमी त्याच्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. तसेच त्याने साखरपुड्याचे अनेक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवरदेखील टाकले आहेत. 
मोहितने त्याचे रिलेशनशिप स्टेटसदेखील फेसबुकवर बदलले आहे. त्याने रूप बिंदरसोबत एन्गेज असल्याचे स्टेटस अपडेट केले आहे. तसेच साखरपुडा झाल्यानंतर त्या दोघांनी काही सेल्फी काढूनदेखील अपलोड केले आहेत. त्यांच्या या फोटोला आणि मोहितच्या स्टेटसला खूप लाइक्स मिळत आहेत. तसेच त्यांना अभिनंदनाच्या अनेक प्रतिक्रियादेखील त्यांच्या फॅन्सनी दिल्या आहेत. 
मोहित सागरने एमटिव्ही रोडीजच्या आठव्या सिझनमध्ये भाग घेतला होता तर रूप सहाव्या सिझनमध्ये झळकली होती. ते दोघे नात्यात असल्याची बातमी त्यांनी कधीच मीडियापर्यंत पोहोचू दिली नाही. त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाच केवळ ही गोष्ट माहीत होती. त्यांनी साखरपुडा केल्यानंतर सगळ्यांना ही बातमी कळली. ही बातमी ऐकून त्यांच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


 

Web Title: Mohit Sagar and Roop Bhindar, the proprietor of MTV Roadies, said,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.