ये है मोहोब्बते या मालिकेतील हा कलाकार लवकरच अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 15:07 IST2017-12-11T09:37:16+5:302017-12-11T15:07:16+5:30
यै है मोहोब्बते ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेचे कथानक तर प्रेक्षकांना प्रचंड ...

ये है मोहोब्बते या मालिकेतील हा कलाकार लवकरच अडकणार विवाहबंधनात
य है मोहोब्बते ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेचे कथानक तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. दिव्यांका त्रिपाठी, अनिता हंसनंदानी, करण पटेल, रुहानिका धवन, आदिती भाटिया, विवेक दहिया, अली गोनी या सगळ्यांना या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत सुरज या भूमिकेत आपल्याला विनित कुमार चौधरीला पाहायला मिळत आहे. विनितच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. विनित कुमार लवकरच लग्न करणार असून तो छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख देखील ठरली असून सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
अभिलाषा झाकरने साथ निभाना साथिया या मालिकेत काम केले होते. अभिलाषा ही छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री असून विनित तिच्यासोबत लग्न करणार आहे. अभिलाषा आणि विनित ४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिलाषा आणि विनित दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. ते जवळजवळ सहा वर्षं नात्यात असून ते आता लग्न करणार आहेत. विनित आणि अभिलाषा यांनी त्यांच्या नात्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले असता त्यांनी लगेचच होकार दिला. विनित आणि अभिलाषा यांनी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जयपूरमध्ये साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते.
विनित आणि अभिलाषा हे गेल्या सहा वर्षांपासून नात्यात असले तरी त्यांनी आपले नाते सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. आपल्या अफेअरविषयी मीडियात चर्चा होऊ नये याची त्यांनी नेहमीच खबरदारी घेतली होती. त्या दोघांनी साखरपुडा झाल्यानंतरच आपल्या नात्याविषयी मीडियाला सांगितले.
विनित आणि अभिलाषा लग्नबंधनात अडकणार असल्याने त्यांचे फॅन्स सध्या प्रचंड खूश आहेत. विनितने नागिन या मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.
Also Read : का दिव्यांका त्रिपाठीने मारली विवेक दहियाच्या कानाखाली?