n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इश्क का रंग सफेद या मालिकेत विप्लवची भूमिका साकारणाऱ्या मिशाल रहेजाने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली होती. त्याचा एक वर्षांचा करार काही दिवसांपूर्वी संपला होता. या कराराची मुदत वाढवण्यासाठी त्याने मालिकेच्या निर्मात्यांकडून पैसे वाढवून मागितले होते. पण निर्मात्यांनी त्याची ही मागणी पूर्ण न केल्याने मिशालने ही मालिका सोडली होती. मिशाल गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रीकरण करत नसून तो लंडनमध्ये फिरायला गेलेला आहे. पण मिशालची लोकप्रियता पाहाता त्याचे मानधन वाढवून देण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे. यामुळे मिशाल पुन्हा या मालिकेचा भाग बनणार आहे. तो 25 जुलैपासून पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
Web Title: Mishal's demands are fulfilled
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.