​मिनी प्रधान बनणार डान्स इंडिया डान्सची परीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:35 IST2017-10-11T06:05:07+5:302017-10-11T11:35:07+5:30

डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन हिट झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार ...

Mini Pradhan will become Dance-Indian Dance examiner | ​मिनी प्रधान बनणार डान्स इंडिया डान्सची परीक्षक

​मिनी प्रधान बनणार डान्स इंडिया डान्सची परीक्षक

न्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन हिट झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी ऑडिशन देखील घेतले जात असून भारतातील विविध शहरात हे ऑडिशन होत आहेत आणि या ऑडिशनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर, मर्जी पेस्टनजी आणि मुदस्सर खान या कार्यक्रमाच्या परीक्षक पॅनेलमध्ये असणार आहेत. त्याचसोबत आता त्यांना कोरियोग्राफर मिनी प्रधानची साथ लाभणार आहे. 
मिनी प्रधान ही क्लासिकल डान्सर असून तिने सरोज खान, फराह खान आणि वैभवी मर्चंट यांसारख्या इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कोरिओग्राफर सोबत काम केले आहे. फराह खानच्या ओम शांती ओम या सिनेमातील दीपिका पादुकोणवर चित्रीत झालेल्या धूम तना या गाण्यातील नृत्याची सगळ्यांनीच प्रशंसा केली होती. या गाण्यामागे मिनीचे योगदान होते. अनेक रिअॅलिटी शो मध्ये मिनीने मुख्य कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे आणि तिच्या तालावर तिने अनेक सेलिब्रिटींना डान्स करायला लावला आहे. परीक्षक म्हणून या नव्या भूमिकेविषयी बोलताना मिनी प्रधान सांगते, “आपल्या नृत्याची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डान्स इंडिया डान्स हा खूप चांगला मंच आहे. हा मंच सामान्य लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतो. मी या शोचे सगळे सिझन फॉलो केले असून या शो ची मी खूप मोठी फॅन आहे. या कार्यक्रमाद्वारे आपल्या देशातील काही असाधारण टॅलेंटचे परीक्षण करण्याची संधी मला मिळणार असल्याने मी प्रचंड खूश आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप चांगले डान्स पाहायला मिळणार आहेत याची मला खात्री आहे.
डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाच्या सहाव्या सिझनचे सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर करणार आहे. तिने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. 

Also Read : कोणती गोष्ट आहे जी अमृता खानविलकरला स्वस्थ बसू देत नाहीये?

Web Title: Mini Pradhan will become Dance-Indian Dance examiner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.