मिलिंद शिंदे झळकणार सरस्वती या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 17:19 IST2017-08-31T11:49:19+5:302017-08-31T17:19:19+5:30
मिलिंद शिंदेने तू तिथे मी, वादळवाट, अग्निहोत्र, गंध फुलांचा गेला सोडूनी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...
.jpg)
मिलिंद शिंदे झळकणार सरस्वती या मालिकेत
म लिंद शिंदेने तू तिथे मी, वादळवाट, अग्निहोत्र, गंध फुलांचा गेला सोडूनी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता मिलिंद शिंदे पुन्हा एकदा एका मालिकेत झळकणार असून त्यांच्या प्रवेशानंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे.
मिलिंद शिंदेने मालिकांप्रमाणेच चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. नटरंग या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. मिलिंद शिंदे आता एका चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार आहेत. हा चित्रपट खेळावर बेतला असून या चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरू आहे.
मिलिंद शिंदे आता त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून एका मालिकेत झळकणार आहेत. सरस्वती या मालिकेच्या कथानकाला सध्या चांगलेच वळण मिळाले आहे. राघव आणि सरस्वती यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. ते एकमेकांपासून कधीच वेगळे होऊच शकत नाही असेच सगळ्यांना वाटत होते. पण नुकतेच राघवचे देविकासोबत लग्न झाले आहे. मालिकेच्या कथानकाला मिळालेल्या या ट्विस्टमुळे या मालिकेच्या फॅन्सना देखील चांगलाच धक्का बसला आहे. सरस्वतीच्या आयुष्यात आता अनेक समस्या निर्माण झाल्या असून ती यातून कशी बाहेर पडणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आता तर तिच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. या मालिकेत लवकरच मिलिंद शिंदेची एन्ट्री होणार आहे. मिलिंद या मालिकेत भुजंग ही व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांच्या एन्ट्रीनंतर सरस्वतीच्या अडचणी आणखीनच वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिलिंद शिंदे यांचा सरस्वती या मालिकेतील लूक हा वेगळा असून त्यांच्या लूकवर सध्या काम सुरू असल्याची चर्चा आहे.
Also Read : अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी तितीक्षा तावडे करायची हे काम,वाचा सविस्तर!