'आई कुठे काय करते'च्या सेटवर मिलिंद गवळींचे या कलाकारासोबत उडायचे खटके, खुद्द त्यांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:45 PM2023-11-25T15:45:10+5:302023-11-25T15:45:43+5:30

Milind Gawali And Rupali Bhosle :मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांनी लोकमत फिल्मीच्या आपली यारी या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रीबद्दल आणि सेटवरील गमतीजमती सांगितल्या.

Milind Gawali's quarrels with this actor on the sets of 'Ai Khe Kya Karte', he himself revealed | 'आई कुठे काय करते'च्या सेटवर मिलिंद गवळींचे या कलाकारासोबत उडायचे खटके, खुद्द त्यांनीच केला खुलासा

'आई कुठे काय करते'च्या सेटवर मिलिंद गवळींचे या कलाकारासोबत उडायचे खटके, खुद्द त्यांनीच केला खुलासा

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेचं कथानक आणि पात्रांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी साकारली आहे तर अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तर संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिने निभावली आहे. दरम्यान मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांनी लोकमत फिल्मीच्या आपली यारी या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रीबद्दल आणि सेटवरील गमतीजमती सांगितल्या. त्यावेळी आई कुठे काय करतेच्या सेटवर मिलिंद गवळींचे एका कलाकारासोबत खटके उडत होते, याबद्दलही सांगितले. 

मिलिंद गवळी यांनी सांगितले की, पहिल्यांदा जेव्हा रुपाली सेटवर आली. तेव्हा सहकलाकार म्हणून मला तिला मदत करायला पाहिजे असे वाटले म्हणून तिथे गेलो. तर आमचा माझा, तिचा आणि अरुंधतीचा मोठा सीन होता. बाहेर लॉनमध्ये होता. त्यात तिला खूप बोलायचंही होतं, त्यामुळे मी तिथे मदत करायला गेलो. तेव्हा लक्षात आलं की ही कसलेली अभिनेत्री आहे. तिला काही मदतीची गरज नव्हती. त्यावेळी तुम्ही नवीन आहात. मी जुनीच आहे अशी वागत होती. ती खूप कॉन्फिडंट आहे, हिला आपली गरज नाही. त्यामुळे मी लांब झालो. 

ते पुढे म्हणाले की, त्यानंतर आमच्यात खटके उडायला लागले. ती मला शिकवायला लागली. तुम्ही इथे उभे राहा. मग मी वैतागायला लागलो.अख्ख्या सीनमध्ये तिचे इनवॉल्वमेंट असते. मला असं झालं की तू नवीन आहेस, तर तू मला का शिकवते. तू तुझं तुझं कर माझं मी करतो आणि असं कोण करतं. या मिलिंद गवळींच्या बोलण्यावर हसत मी असं उत्तर दिलं.

Web Title: Milind Gawali's quarrels with this actor on the sets of 'Ai Khe Kya Karte', he himself revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.