मिका सिंग गाणार ‘खिचडी’चे शीर्षकगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 12:38 IST2018-03-21T07:08:08+5:302018-03-21T12:38:08+5:30

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली.नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ...

Mika Singh singer titled 'Khichadi' | मिका सिंग गाणार ‘खिचडी’चे शीर्षकगीत

मिका सिंग गाणार ‘खिचडी’चे शीर्षकगीत

०४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली.नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.प्रचंड गाजलेली ‘खिचडी’ ही मालिका पुन्हा सुरू होणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच या मालिबद्दल तीव्र उत्कंठा निर्माण झाली आहे. आता पुन्हा रसिकांना खळखळुन हसवण्यासाठी ही मालिका पुन्हा सुरू करण्यात येत असल्याने त्यात या क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारच भूमिका साकारतील, याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.पण एवढेच नव्हे; तर या मालिकेचे शीर्षकगीत गाण्यासाठी निर्मात्यांनी प्रसिध्द पॉप गायक मिकासिंग याच्याकडे विचारणा केली असल्याचे आमच्या कानावर आले आहे. आता ‘खिचडी’ ही मालिका नव्या स्वरूपात सादर होत असल्याने निर्मात्यांना त्यात थोडा हलकाफुलका भावना हवी होती. त्यामुळे मिकासिंगला आपले गाणे त्या दृष्टीने गाण्याची विनंती निर्मात्यांनी केली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार,“या मालिकेचे शीर्षकगीत काहीसे वेगळ्या पध्दतीने सादर व्हावं, अशी निर्मात्यांची इच्छा होती.म्हणून त्यांनी मिकासिंगकडे विचारणा केली.त्याने गायलेल्या उडत्या चालीच्या गीतावर निर्माते खुश आहेत.या गाण्याला अंतिम चाल देम्याची प्रक्रिया सुरू असून अंतिम गीत लवकरच धवनिमुद्रित होईल.”



cnxoldfiles/a>हंसाचे व्हॉट इज प्रफुल्ल असे विचारणे, हंसा आणि प्रफुल्लची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत काही बडे आणि नामवंत कलाकार भूमिका साकारणार असले, तरी त्यातील एक गमतीदार भाग आता उघड झाली आहे.या मालिकेचे निर्माते जे. डी. मजिथिया आणि आतिश कापडिया यांनी मालिकेतील कलाकारांच्या ख-या नातेवाईकांनाही या मालिकेत भूमिका दिल्या आहेत. उदाहरणार्थ, नामवंत अभिनेत्री रत्ना पाठक-शहा ही ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेत माया साराभाई ही भूमिका रंगवीत असून तिची बहीण सुप्रिया पाठक ही ‘खिचडी’त हंसा पारेखची भूमिका साकारीत आहे.वंदना पाठकचे वडील आणि अभिनेते अरविंद वैद्य हे ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये मधुसूदन फुफाची भूमिका रंगवीत असून ते आता ‘खिचडी’च्या नव्या आवृत्तीत हंसा आणि हिमांशू पारेख यांचे पडद्यावरील वडील म्हणून भूमिका रंगविणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Mika Singh singer titled 'Khichadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.