'इंडिया के मस्त कलंदर'च्या मंचावर मिका सिंग स्पर्धकांसोबत करणार परफॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:16 IST2018-08-02T15:15:07+5:302018-08-02T15:16:42+5:30

या भागात प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रेटी हजेरी लावत असतात.त्याचप्रमाणे मिका सिंगने या मंचावर स्पर्धकांसह खास परफॉर्मही करणार आहे.

 Mika Singh performances with contestants on the stage of India's Mast Kalander | 'इंडिया के मस्त कलंदर'च्या मंचावर मिका सिंग स्पर्धकांसोबत करणार परफॉर्म

'इंडिया के मस्त कलंदर'च्या मंचावर मिका सिंग स्पर्धकांसोबत करणार परफॉर्म

'इंडिया के मस्त कलंदर' कार्यक्रमामध्ये प्रत्येक आठवड्यात मनोरंजनाचा पारा अधिकच वर चढत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्पर्धकांचे रंजक परफॉर्मन्सने हा कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर सादर होणारे कलाकारांचे हटके परफॉर्मन्सेस रसिकांना दरवेळी  फुल ऑन एंटरटेन करत असतात. तसेच या भागात प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. त्याचप्रमाणे मिका सिंगने या मंचावर स्पर्धकांसह खास परफॉर्मही करणार आहे.

मिका हजेरी लावणार म्हटल्यावर या कार्यक्रमाच्या आगामी भागातही  रसिकांसाठी  एक संगीतमय मेजवानी असणार आहे. 'फिल्मी कव्वाल' हा नागपूरचा ग्रुप आपल्या जोषपूर्ण सादरीकरणाने मंचावर एकच स्वरकल्लोळ  गुंजणार आहे. लोकप्रिय गाण्यांच्या ओळी आणि शेर-ओ-शायरी यांची अनोखी गुंफण या सादरीकरणामध्ये केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर खुद्द पॉप किंग मिका सिंग या ग्रुपच्या सोबतीने गाताना दिसणार असून स्टार परिक्षक गीता कपूर यांचे नेत्रदीपक सादरीकरण हे सुद्धा या भागाचे विशेष आकर्षण असणार आहे. 

या कार्यक्रमाच्या येत्या भागांमध्येही चाहत्यांना अशा अनेक सादरीकरणांचा  ट्रीटच मिळणार आहे. कारण उंच टाचांचे बूट घालून नाचणाऱ्या  स्पर्धकांचा ग्रुप डॅझलर्स आपली विस्मयकारक कला इथे सादर करणार आहेत तर वयाच्या पंचाहत्तरीमधले एक जोडपे चक्क 'आती क्या खंडाला' वर नृत्य सादर करत सा-यांनाचा  थक्क करणार आहेत. 

या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांना प्रेक्षकांची वाहवा मिळत आहेच पण त्याचबरोबर सुमित राघवन आणि राजीव ठाकूर या सूत्रसंचालकांच्या अफाट विनोदी टायमिंगचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमातील वातावरण सदा हसतखेळत ठेवणारी ही जोडी आपल्या चटपटीत विनोदांनी प्रेक्षकांना या कार्यक्रमाशी बांधून ठेवण्यात यशश्वी ठरली आहे. 

अभिनेता सुमीत राघवन सांगतो, "गीता कपूर आणि मिकासोबत काम करण्याची संधी लाभल्याने मी खूप खुश आहे. 'इंडिया के मस्त कलंदर' हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. इथे स्पर्धकांना आपल्या 'टॅलेंट'ला एक नवा आयाम द्यायची संधी मिळते. मला रसिकांना हसवायला आवडतं आणि रसिक आणि स्पर्धक या दोघांचीही साथ देण्यास आता मी नेहमीच उत्सुक असतो."

Web Title:  Mika Singh performances with contestants on the stage of India's Mast Kalander