'माझ्या नव-याची बायको' फेम' या अभिनेत्रीने गाठलं कोकण, जाणून घ्या तिच्या कोकण दौऱ्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 03:28 PM2022-03-30T15:28:20+5:302022-03-30T16:37:23+5:30

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री आपल्या व्यस्य शेड्यूलमधून वेळ काढून कोकणात पोहोचली आहे.

Mazya Navryachi Bayko fame actress arrives in Konkan, find out about it | 'माझ्या नव-याची बायको' फेम' या अभिनेत्रीने गाठलं कोकण, जाणून घ्या तिच्या कोकण दौऱ्याविषयी

'माझ्या नव-याची बायको' फेम' या अभिनेत्रीने गाठलं कोकण, जाणून घ्या तिच्या कोकण दौऱ्याविषयी

googlenewsNext

सर्वसामान्य माणूस असो किंवा कलाकार प्रत्येकाची आपल्या मातीशी आपल्या गावाशी नाळ जोडलेली असते. असे असूनही अनेकदा कामामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकांना वर्षानुवर्षे आपल्या घरी आपल्या गावाला जाता य़ेत नाही.असंच काहीसं 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया  अर्थातच अभिनेत्री रुचिरा जाधवसोबतसुद्धा घडलंय. रुचिरा ही मुळची कोकणतील चिपळुणची..पण शुटिंगच्या व्यस्त शेड्युलमुळे तीचं गेले कित्येक वर्ष गावाला जाणं झालंच नाही. पण यंदा शुटिंग नसल्यानं रुचिराने थेट चिपळूण गाठलं. शिमग्याला ती गावाला पोहोचली.

.रुचिराने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, बाबांची खूप ईच्छा असते, मी गावी यावं.नेहमीच तसा आग्रह असतो त्यांचा.गेली काही वर्ष कामामुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे जाऊ शकले नव्हते.मला स्वत:ला गणपतीला गावी जायला आवडतं. पावसाळयात कोकण म्हणजे स्वर्गच.पण यावेळी ठरवून शिमग्यासाठी १-२ दिवस का होईना, जाणारच होते. घरी पालखी येते, देव येतात. आपणही त्यांना भेटायला जायला हवं, या भावनेने मी गेले.मी तिथे 24 तासच होतो, पण प्रत्येक क्षण जगले.

संध्याकाळी गावाकडची सगळी मंडळी व चाकरमानी मिळून पालखी नाचवतात.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी घरी आली.सगळ्या कुटुंबाने एकत्र मिळून पूजा केली.देवा महाराजा.. यावेळी रुचिराने गावाजवळ असेलेल्या सोमेश्वर मंदिराला भेट दिली.

रुचिराने आजवर अनेक मालिकामध्ये भूमिका साकारल्या पण ती घराघारात लोकप्रिय झाली ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया म्हणून...या मालिकेतून रुचिराला एक खास ओळख मिळाली होती. खलनायिका असूनसुद्धा रुचिराला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं..

Web Title: Mazya Navryachi Bayko fame actress arrives in Konkan, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.