याला म्हणतात संस्कार! भररस्त्यात मुख्यमंत्र्यांच्या पाया पडली चिमुकली मायरा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:42 AM2023-10-16T11:42:19+5:302023-10-16T11:43:25+5:30

मायराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मायराच्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

mazi tuzi reshimgath fame child artist myra vaikul touches feet of cm eknath shinde video viral | याला म्हणतात संस्कार! भररस्त्यात मुख्यमंत्र्यांच्या पाया पडली चिमुकली मायरा, व्हिडीओ व्हायरल

याला म्हणतात संस्कार! भररस्त्यात मुख्यमंत्र्यांच्या पाया पडली चिमुकली मायरा, व्हिडीओ व्हायरल

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून बालकलाकार मायरा वायकुळने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेत तिने परीची भूमिका साकारली होती. मायराच्या सालस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मायराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मायराच्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

ठाण्याच्या प्रसिद्ध अशा टेंभीनाका देवीच्या आगमनाला मायरा वायकुळने हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे उपस्थित होते. मायराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी तिच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मायरा  भररस्त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाया पडली. तिच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनीही मायराचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान, मायरा सध्या 'नीरजा एक नई पहचान' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक गाण्यांतही मायरा झळकली आहे. मायराचा चाहता वर्ग मोठा असून तिचं सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. 

Web Title: mazi tuzi reshimgath fame child artist myra vaikul touches feet of cm eknath shinde video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.