'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आहे खऱ्या आयुष्यात उत्कृष्ट ढोलवादक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:11 AM2022-08-23T11:11:37+5:302022-08-23T12:14:20+5:30

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण केले आहे.अप्पी उर्फ शिवानीनं कंबरेला ढोल बांधला अन् असा काही दणक्यात वाजवला की, सगळेच आश्चर्यचकित झालेत.

Marthi Serial Appi Amchi Collector fame Shivani Naik is an excellent drummer in real life | 'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आहे खऱ्या आयुष्यात उत्कृष्ट ढोलवादक

'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आहे खऱ्या आयुष्यात उत्कृष्ट ढोलवादक

googlenewsNext

झी मराठीवर २२ ऑगस्टपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली, “अप्पी आमची कलेक्टर” ही मालिका एक वेगळा विषय घेऊन आली आहे. 'अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन मिळत नाही.पण तिचं ध्येय खूप मोठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.

ह्या प्रेरणात्मक मालिकेचे लेखन अभयसिंग जाधव ह्यांचे असून दिग्दर्शन आशुतोष बाविस्कर ह्यांचे आहे.  ह्या  मालिकेत शिवानी नाईक सोबत रोहित परशुराम प्रमुख भूमिकेत असणार आहे. ह्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करत आहे. शिवानी ने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. 

https://youtube.com/shorts/tRprzLpUx3k?feature=share

सातारा आणि कोल्हापूर  येथे "अप्पी आमची कलेक्टर" या मालिकेच्या निमित्ताने रॅलीच आयोजन करण्यात आले होते. ह्या रॅली साठी सातारकरांनी व कोल्हापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ह्या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे आणि आपली सगळ्यांची लाडकी शिवानी नाईक (अप्पी) ह्या दोघीनी दणक्यात ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिवानी नाईक ही उत्कृष्ट ढोलवादन करते. अशा हुशार, कलासंपन्न  शिवानी नाईक कलेक्टरच्या भूमिकेत आपला ठसा उमटवणार आहे. या मालिकेचे चित्रण सातारा आणि आसपास च्या गावात होत आहे.
 

Web Title: Marthi Serial Appi Amchi Collector fame Shivani Naik is an excellent drummer in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.