Tu Chal Pudha : लेखक खरंच डोक्यावर पडलाय...; 'तू चाल पुढं' मालिका होतेय ट्रोल, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 04:10 PM2023-03-30T16:10:59+5:302023-03-30T16:13:10+5:30

Tu Chal Pudha : अभिनेत्री दीपा परबची (Deepa Parab) ज 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण तूर्तास ही मालिका ट्रोल होतेय....

marathi tv serial Tu Chal Pudha troll on social media | Tu Chal Pudha : लेखक खरंच डोक्यावर पडलाय...; 'तू चाल पुढं' मालिका होतेय ट्रोल, कारण...

Tu Chal Pudha : लेखक खरंच डोक्यावर पडलाय...; 'तू चाल पुढं' मालिका होतेय ट्रोल, कारण...

googlenewsNext

अभिनेत्री दीपा परबची (Deepa Parab) ज 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची कथा असलेली मालिका आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. आता ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेत आता 'मिसेस इंडिया 2023 ग्रॅन्ड फिनाले' पाहायला मिळणार आहे. मालिकेती नायिका असेलल्या अश्विनी वाघमारे ही या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. मिसेस इंडिया 2023चा खिताब ती आपल्या नावावर करते की नाही, हे लवकरच कळेल. पण तूर्तास ही मालिका ट्रोल होतेय.

'तू चाल पुढं' मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत अश्विनी अंतिम फेरीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही परिक्षकाच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत शिल्पीदेखील परिक्षकाच्या खुर्चीत आहे. हीच शिल्पी मुद्दाम अश्विनीला इंग्रजीतून उत्तर द्यायला सांगते. मात्र अश्निनी मातृभाषेत बोलण्याची परवानगी मागते. आपल्या मातृभाषेत आपल्या मनातलं बोलण्याची परवानगी अश्विनीला मिळेल की नाही, हे कळेलच. पण चाहत्यांना मात्र या प्रोमोतील शिल्पी चांगलीच खटकली आहे.  शिल्पीला मिसेस इंडिया 2023  स्पर्धेत परिक्षकांच्या खुर्चीत पाहून अनेकांनी  मालिकेची खिल्ली उडवली आहे. 

मिसेस इंडिया स्पर्धेसाठी जज होण्याची पात्रता शिल्पीला कशी? उगीच सगळीकडे शिल्पी कशी पोहोचेल . शिल्पीचं योगदान काय ? लेखक काय डोक्यावर पडलाय का? अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल केलं आहे. अती फालतुगिरी दाखवली आहे. नणंद वहिनीला किडनॅप करायचा प्लान करते, लेखक खरंच डोक्यावर पडलायं, असं एका युजरने म्हटलं आहे. 

मालिकेत शिल्पीची भूमिका अभिनेत्री धनश्री काडगांवकरने साकारली आहे. अश्विनीच्या भूमिकेत दीपा परब आहे. अश्विनीलाने मोठा पल्ला गाठला असला तरी शिल्पी तिच्या या प्रवासात अडथळे आणते. मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनालेही शिल्पी तिच्या प्रवासात अडथळे आणताना दिसतेय.
दीपा परबने जवळपास 14 वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मालिकेच्या माध्यमातून मराठीत कमबॅक केलं आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दीपा ही अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे.
 

Web Title: marathi tv serial Tu Chal Pudha troll on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.