अभ्याने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; पाहा समीर परांजपेच्या मुलीचा गोड फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 18:54 IST2022-01-23T18:53:03+5:302022-01-23T18:54:12+5:30
Sameer paranjape: सोशल मीडियावर सक्रीय असलेला समीर अनेकदा त्याच्या गाण्याचे काही व्हिडीओ वा फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या बाळाचा गोड फोटो शेअर केला आहे.

अभ्याने पहिल्यांदाच दाखवली लेकीची झलक; पाहा समीर परांजपेच्या मुलीचा गोड फोटो
छोट्या पडद्यावरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे. या मालिकेत समीरने अभिमन्यु जहागीरदार ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनयशैलीमुळे समीरने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. समीर कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा सेटवरील वा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या चिमुकल्या बाळाचा फोटो शेअर करुन सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेला समीर अनेकदा त्याच्या गाण्याचे काही व्हिडीओ वा फोटो शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या बाळाचा गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये समीरने त्याच्या लेकीला कुशीत कवटाळलं असून त्याची लेक कॅमेरात पाहून स्मित हास्य करत आहे. त्यामुळे या बापलेकीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, यापूर्वीही समीरने अनेकदा त्याच्या लेकीचे फोटो शेअर केले होते. परंतु, त्या फोटोंमध्ये तिचा चेहरा झाकण्यात आला होता. मात्र, आता पहिल्यांदाच समीरने त्याच्या गोड फोटो शेअर करत चाहत्यांना बाळाची पहिली झलक दाखवली आहे.