आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:59 PM2022-07-05T15:59:20+5:302022-07-05T16:00:06+5:30

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक, यशला दोषी मानत असून त्याच्या बाजूने लढायची किंवा त्याला साथ द्यायची काहीही गरज नाही, असं अनघाला सांगतो.

marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati will shout at Abhishek | आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या स्टार प्रवाहवरील मालिकेत सध्या मोठं रंजक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. इशाला वाचवण्यासाठी यश, नीलवर हल्ला करतो. परिणामी, नीलच्या खुनाचा आरोप यशवर आला आहे. मात्र, या संकटात संपूर्ण देशमुख कुटुंबीय यशच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर दुसरीकडे अभिषेक मात्र, यशच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर यश कशाप्रकारे चुकला हे सांगायचा प्रयत्न करतो. मात्र, या काळात अरुंधती अभिषेकला खडे बोल सुनावते. इतकंच नाही तर त्याच्या संकटकाळात यशने त्याची कशी साथ दिली हेदेखील सांगते.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक, यशला दोषी मानत असून त्याच्या बाजूने लढायची किंवा त्याला साथ द्यायची काहीही गरज नाही, असं अनघाला सांगतो. मात्र, तो हे सारं काही सांगत असताना अरुंधती तेथे येते आणि सारं काही ऐकते. त्यामुळे संतापलेली अरुंधती अभिषेकला त्याच्या जुन्या दिवसांची आठवण करुन देते.

दरम्यान, हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी अभिषेकवर हल्ला केल्यानतंर त्याला वाचवणारा यशचं होता याची आठवण अरुंधती त्याला करुन देते. इतकंच नाही तर कधीतरी यशला साथ दे असंही सांगते. त्यामुळे आता यशच्या या लढ्यात देशमुख कुटुंबासह अभिषेक त्याला साथ देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati will shout at Abhishek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.